पाटलांचा एकतर्फी विजय

By admin | Published: February 7, 2017 12:05 AM2017-02-07T00:05:10+5:302017-02-07T00:05:10+5:30

निकालसाठी किमान मंगळवार उजाडेल, अशी अपेक्षा असतानाच रणजित पाटलांना पहिल्याच फेरीपासून आघाडी घेतली.

One-sided victory of the Patels | पाटलांचा एकतर्फी विजय

पाटलांचा एकतर्फी विजय

Next

७८ हजार ५१ मते : पहिल्या फेरीपासूनच मतांची आघाडी
मुख्यमंत्र्यांचे सारथी म्हणून काम करेन
पदवीधर मतदारसंघातून विजयाची जोरदार मुसंडी मारल्यानंतर रणजित पाटील यांनी शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी आणि मतदारांचा विश्वास हेच यशाचे गमक मानले. येत्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाचे पालन करेन. पक्ष संघटनात्मक अथवा कोणतेही कामे मुख्यमंत्र्यांनी सोपविल्यास त्यांचे सारथी म्हणून पुढे नेईल. प्रज्ञावंतांनी भाजपच्या बाजूने कौल दिला आहे. पदवीधर निवडणूक ही आरसा होती. मात्र मुख्यमंत्री, पंतप्रधानांवर मतदारांनी विश्वास दर्शविला, असे रणजित पाटील म्हणाले.
अमरावती : निकालसाठी किमान मंगळवार उजाडेल, अशी अपेक्षा असतानाच रणजित पाटलांना पहिल्याच फेरीपासून आघाडी घेतली. त्यांनी एकतर्फी विजय मिळवून प्रतिस्पर्धांना नमविले. पहिल्या फेरीत कोणीही मतांचा कोटा पूर्ण करू शकणार नाही, ही उत्कंठा होती. मात्र, पाटलांनी ७८ हजार ५१ मते प्राप्त करून राजकीय धुरिणांचे सगळे अंदाज फोल ठरविले.
येथील विभागीय क्रीडा संकुलात सोमवारी सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरू झाली. पहिल्या टप्प्यात मतपत्रिका सरमिसळ करण्यात आल्यात. व हजार मतांचे गठ्ठे तयार करण्यात आले. ते ३० टेबलवर मोजण्यात आले. यामध्ये रणजित पाटील यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेत ती सहाव्या फेरीपर्यंत कायम ठेवली. पदवीधर निवडणुकीत १,३३,५८७ मतदारांनी हक्क बजावला होता. या निवडणुकीत १३ उमेदवार ंिरंगणात होते. त्यामुळे पहिल्या फेरीत विजयासाठी ६१, ६८१ एवढ्या मतांचा कोटा कोणीही उमेदवार पूर्ण करु शकणार नाही, असा ‘राजकीय’ अंदाज निवडणुकीनंतर बांधल्या गेला.

चवथ्या फेरीत झाली विजयाची निश्चिती
अमरावती : मात्र, रणजित पाटील यांनी पहिल्या ते सहाव्या फेरीपर्यत आघाडी घेत विजयाचा रथ कायम ठेवला. काँग्रेसचे संजय खोडके यांच्यासह अन्य १२ उमेदवारांना मतांची आघाडी घेण्यासाठी संधी पाटलांनी शेवटपर्यंत दिली नाही, हे विशेष!. तिसऱ्या फेरीत पाटलांनी ५४ हजार ९२५ मते प्राप्त केल्याने आता विजय नक्कीच होणार, हे स्पष्ट झाले होते. मात्र अमरावती जिल्ह्याची मतमोजणी शेवटी असल्याने काही वेगळे होईल काय? ही चिंता स्वत: रणजित पाटलांना होती. ही भावना त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केली. एकदा मतमोजणी होऊ द्या, त्यानंतरच विजयाबाबतची प्रतिक्रिया देईल, असे म्हणत पाटलांनी वेळ मारुन नेली. परंतु चवथ्या फेरीनंतर पाटलांच्या खात्यात ७१ हजार ६ मते गोळा होताच त्यांचा विजय निश्चित झाला. पाचव्या फेरीनंतर ७७, ८५४ मते त्यांनी प्राप्त केली. केवळ औपचारिता म्हणून सहाव्या फेरीची मतमोजणी झाली. सहाव्या फेरीत १८७ मते घेवून पाटलांनी एकुण ७८ हजार ५१ मते घेण्याचा विक्रम नोंदविला. पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत पहिल्या पसंती क्रमांकाचे मते प्राप्त करुन विजय संपादन केल्याची नोंद रणजित पाटलांनी दुसऱ्यांदा केली आहे. यापूर्वी बी. टी. देशमुख यांनी पहिल्या पसंती क्रमांकाची मते घेवून विजयी मिळविला होता. पहिल्या फेरीतच विजयी मतांचा कोटा पूर्ण करण्यात आल्याने दुसऱ्या पसंती क्रमांकासाठी मतमोजणीची गरज नाही, अशी घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी जे. पी. गुप्ता यांनी केली. ही माहिती आयोगाला कळविल्यानंतर व त्यांच्या परवानगीनंतर अमरावती विभाग पदवीधर मतदार संघातून विजयी झाल्याचे प्रमाणपत्र रणजित पाटलांना बहाल करण्यात आले. यावेळी मुख्य निवडणूक निरिक्षक तथा राज्याचे कृषी आयुक्त विकास देशमुख मतमोजणी प्रक्रियेदरम्यान पूर्णवेळ उपस्थित होते.

पाटील, पोटे अन् खोडके
यांच्यात रंगला पानाचा विडा
रणजित पाटील यांचा विजय निश्चित झाला असताना काँग्रेसचे संजय खोडके व रणजित पाटील हे निवडणुकीच्या गप्पांमध्ये रंमले. पदवीधर निवडणुकीत गत दोन महिन्यात झालेल्या घडमोडींवर चर्चा सुरु होती. याचवेळी पालकमंत्री प्रवीण पोटे हे देखील दाखल झाले. दरम्यान खोडकेंसाठी आणलेले पानाचे विडे त्यांनी ना. पोटे व पाटील यांनाही दिले. त्यानंतर यांच्यात ‘राजकीय’ पानाचा विडा रंगला, हे विशेष.

पाणी झिरपल्याने २०० मतपत्रिका भिजल्या
विभागीय क्रीडा संकुलातील स्ट्राँग रुममध्ये कडेकोट बंदोबस्तात ठेवण्यात आलेल्या मतपेट्यांवर पाणी झिरपले. परिणामी २०० मतपत्रिका भिजल्या होत्या. मतपेट्या उघडताना ही बाब सकाळी ८ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास प्रशासनाचा लक्षात आली. त्यानंतर मतमोजणी परिसरातील भिजलेल्या मतपत्रिका टेबलवर वाळविण्यात आल्यात. ही बाब उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर प्रशासनाने स्पष्ट केली.

महत्त्वाची खाती सांभाळण्याचा रणजित पाटलांचा अनुभव आहे. शिक्षकांच्या समस्या सोडविणे, रोजगार मेळावे आदींमुळे पहिल्याच फेरीत विजयी होतील, असा आत्मविश्वास होता. पक्षांच्या कार्यकर्त्यांनी अपार परिश्रम घेतले ते फळाला आले.
- प्रवीण पोटे, पालकमंत्री, अमरावती

Web Title: One-sided victory of the Patels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.