कला, वाणिज्य, विज्ञान शाखेच्या ऑनलाईन परीक्षा ८ जूनपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:10 AM2021-06-01T04:10:23+5:302021-06-01T04:10:23+5:30

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कला, वाणिज्य व विज्ञान शाखांच्या ऑनलाईन परीक्षा ८ जूनपासून घेण्यात येणार आहे. त्या ...

Online exams for Arts, Commerce, Science from June 8 | कला, वाणिज्य, विज्ञान शाखेच्या ऑनलाईन परीक्षा ८ जूनपासून

कला, वाणिज्य, विज्ञान शाखेच्या ऑनलाईन परीक्षा ८ जूनपासून

Next

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कला, वाणिज्य व विज्ञान शाखांच्या ऑनलाईन परीक्षा ८ जूनपासून घेण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने परीक्षा विभागात वेळापत्रक तयार करण्यात येत आहे. या ऑनलाईन परीक्षांचे महाविद्यालय स्तरावर नियोजन करण्यात येणार आहे. पावणे दोन लाख विद्यार्थी आणि २,२०० विषयांची होणार परीक्षा होणार आहे.

विद्यापीठाने यापूर्वी विधी, फार्मसी व अभियांत्रिकी परीक्षांचे ऑनलाईन नियोजन केले हाेते. तक्रारीविना अथळ्यांनी ही परीक्षा आटोपली. केवळ अभियांत्रिकी सत्र १ च्या परीक्षा आटोपल्या आहेत. मात्र, वर्षभरापासून रखडलेली हिवाळी- २०२० च्या कला, वाणिज्य व विज्ञान शाखांच्या परीक्षा ऑनलाईन घेण्यात येणार आहे. त्याकरिता परीक्षा मंडळाने शिक्कामोर्तब केले आहे. प्राचार्य, महाविद्यालयांच्या संचालकांना ऑनलाईन परीक्षांबाबत कळविण्यात आले आहे. विद्यापीठाने आतापर्यंत १ हजार विषयांच्या ऑनलाईन परीक्षा घेतल्या आहेत.

----------------------

विधी, फार्मसी, अभियांत्रिकी परीक्षांचे गुणपत्रिका केव्हा?

विद्यापीठाने विधी, फार्मसी व अभियांत्रिकीच्या ऑनलाईन परीक्षा तक्रारीविना पार पाडल्या आहेत. परीक्षा होताच स्वयंचलित गुणांकनाची प्रक्रियादेखील आटोपली आहे. काही विषयांचे निकाल जाहीर झाले असून, गुणपत्रिका तयार होत आहे. कोरोना संक्रमणामुळे संचारबंदी असल्याने महाविद्यालये बंद आहे. कर्मचारी उपस्थिती नसून, कार्यालयीन कामकाज ठप्प आहे. लवकरच विद्यार्थ्यांना गुणपत्रिका वितरित केल्या जातील, अशी माहिती आहे.

-------------------------------

कोट

कला, वाणिज्य व विज्ञान शाखांच्या ऑनलाईन परीक्षांचे नियोजन ८ जूनपासून होणार आहे. वेळापत्रक तयार करण्यात येत आहे. परीक्षा मंडळानेसुद्धा मान्यता दिली आहे.

- हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मू्ल्यांकन मंडळ

Web Title: Online exams for Arts, Commerce, Science from June 8

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.