‘ऑपरेशन गोल्ड’; 10 किलो सोन्याचे घबाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2022 05:00 AM2022-03-07T05:00:00+5:302022-03-07T05:00:58+5:30

आपली श्रीजी गोल्ड कंपनी असल्याचे त्याने सांगितले. मात्र, त्या व्यवहाराच्या अधिकृत पावत्या त्याच्याकडे नव्हत्या. चार वर्षांपासून मुंबईहून सोने आणून त्याबाबतचा व्यवहार या सदनिकेतून करीत असल्याचे सांगण्यात आले. मात्र, त्याचे बिल, कारागिराला दिलेले सोने व एकूणच व्यवहाराचा अधिकृत दस्तावेज आरोपींकडे नसल्याने ते सर्व सोने जप्त करण्यात आले. आता त्याबाबत तपास करण्याची परवानगी राजापेठ पोलीस न्यायालयाला मागणार आहेत.

‘Operation Gold’; 10 kg of gold | ‘ऑपरेशन गोल्ड’; 10 किलो सोन्याचे घबाड

‘ऑपरेशन गोल्ड’; 10 किलो सोन्याचे घबाड

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राजापेठ पोलिसांनी दसरा मैैदानासमोरील एका सदनिकेतून तब्बल ५ कोटी रुपयांच्या सोन्यासह ५ लाख ३९ हजार रुपये रोख पकडली. ताब्यात घेतलेले दोघेही त्याबाबत कुठलाही अधिकृत पुरावा देऊ शकले नाहीत. पोलिसांनी याबाबत आयकर विभागाला कळविले असून, रविवारी रात्री १० वाजतापासून सुरू झालेली ही कारवाई सोमवारी पहाटे ५ वाजेपर्यंत चालली. त्या जप्त सोन्याचा ‘कच्चा चिठ्ठा’देखील पोलिसांनी जप्त केला. 
प्राथमिक माहितीनुसार, कर चुकविण्यासाठी त्या सोन्याचा कच्च्या चिठ्ठीद्वारे व्यवहार होत होता. आपण ते सोने मुंबईच्या सराफा मार्केटमधून आणून, त्याचे स्थानिक कारागिरांकडून दागिने करवून घेत, ते येथील सराफा व्यावसायिकांना विकत असल्याची माहिती राजेंद्रसिंह राव याने दिली. आपली श्रीजी गोल्ड कंपनी असल्याचे त्याने सांगितले. मात्र, त्या व्यवहाराच्या अधिकृत पावत्या त्याच्याकडे नव्हत्या. चार वर्षांपासून मुंबईहून सोने आणून त्याबाबतचा व्यवहार या सदनिकेतून करीत असल्याचे सांगण्यात आले. मात्र, त्याचे बिल, कारागिराला दिलेले सोने व एकूणच व्यवहाराचा अधिकृत दस्तावेज आरोपींकडे नसल्याने ते सर्व सोने जप्त करण्यात आले. आता त्याबाबत तपास करण्याची परवानगी राजापेठ पोलीस न्यायालयाला मागणार आहेत. हा हवालाचादेखील व्यवहार असू शकतो, अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली.  कारवाईसाठी राजापेठ पोलीस पहाटे ५ पर्यंत जागले. ते १० किलो सोने एका लोखंडी पेटीत ठेवून ती पेटी मालखान्यात सुरक्षित ठेवण्यात आली. त्यात चार बॉक्समध्ये आढळलेल्या कच्च्या चिठ्ठ्यादेखील ठेवण्यात आल्या आहेत.
यांनी केली कारवाई
पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह, पोलीस उपायुक्त विक्रम साळी, सहायक आयुक्त भारत गायकवाड  यांच्या मार्गदर्शनात राजापेठचे ठाणेदार  मनीष ठाकरे, पोलीस निरीक्षक  सुरेंद्र अहेरकर,  उपनिरीक्षक किसन मापारी, डीबी स्कॉडमधील सागर सरदार, छोटेलाल यादव, नीलेश गुल्हाने,  दिनेश भिसे, विकास गुडधे, नरेश मोहरील, पवन घोम, दिनेश आखरे, वकील शेख, राजू लांजेवार, मंगेश शिंदे, सुनील विधाते, राजेश गुरेले, चालक नीलेश पोकळे, सुनील ढवळे, साधना इंगोले यांनी केली.

पुढे काय? : याबाबत रविवारी रात्रीच आयकर विभागाच्या येथील सहायक संचालकांसह नागपूरचे आयकर सहआयुक्त अमोल खैरनार यांना माहिती देण्यात आली. जीएसटी व अन्य करांची चुकवेगिरी करण्यासाठी सुवर्णदागिन्यांचा बेहिशेबी साठा करण्यात आला होता, अशी प्राथमिक माहिती आयकर विभागाला देण्यात आली. याबाबत न्यायालयात तपासाची परवानगी मिळाल्यानंतर त्या सोन्याच्या दागिन्यांचे वास्तव उघड होईल. ज्या सुवर्णकारांना दागिने विकत असल्याचा दावा करण्यात आला, ते सुवर्णकारदेखील चौकशीच्या टप्प्यात येतील. 

जप्त दागिन्यात काय?
दोन आरोपींकडून एकूण १० किलो २३८ ग्रॅम व ९०० मिली सोने जप्त करण्यात आले. त्यात सुमारे ५८० ग्रॅमची बिस्किटे, तर ९ किलो ६०० ग्रॅमहून अधिक वजनाचे सोन्याचे हार, कर्णफुले, अंगठ्या, चेन, चपलाहार, ब्रेसलेट आदी दागिने आहेत. 

तूर्तास दोन आरोपींना अटक केली आहे. जप्त सोने व रकमेबाबत आयकर विभागाच्या वरिष्ठांना कळविले. तपास करण्यासाठी न्यायालयाची परवानगी घेऊ. जप्त मुद्देमालाबाबत आरोपींकडे वस्तुनिष्ठ माहिती, दस्तावेज आढळून आले नाहीत.
मनीष ठाकरे,
ठाणेदार, राजापेठ 
 

 

Web Title: ‘Operation Gold’; 10 kg of gold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.