साथीच्या आजारांनी डोके काढले वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:12 AM2021-07-25T04:12:57+5:302021-07-25T04:12:57+5:30

अमरावती : एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना दुसरीकडे साथीच्या आजारांमुळे डोकेदुखी वाढू लागली आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून डायरिया, ...

Outbreaks appear to be exacerbated during this time | साथीच्या आजारांनी डोके काढले वर

साथीच्या आजारांनी डोके काढले वर

Next

अमरावती : एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना दुसरीकडे साथीच्या आजारांमुळे डोकेदुखी वाढू लागली आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून डायरिया, कॉलरा, वात विकार, सर्दी, खोकला याशिवाय कावीळ, गॅस्ट्रो, लेप्टोस्पायरोसिस चिकनगुनिया, मलेरिया डेंग्यू असे आजार डोके वर काढू लागले आहे. या आजारापासून बचावासाठी काळजी घेणे गरजेचे आहे.

पावसाळ्यात अशा आजाराकडे कोरोना संकटाच्या काळात दुर्लक्ष करून मुळीच चालणार नाही. पावसाळा सुरू झाल्यापासून ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी अशा आजारात वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता वेळेत उपचार करून घेणे गरजेचे आहे. याशिवाय पावसात, डायरिया, कॉलरा, वात विकार उद्भवतात. दूषित पाण्यामुळे कावीळ, गॅस्ट्रो, लेप्टोस्पायरोसिस यासारखे विकार जडतात. या आजारांमुळे पचनक्रिया मंदावते. रोगप्रतिकारशक्ती कमी होत असल्याने संसर्गजन्य आजारांची लागण होते. पावसाळ्यात अनेकदा संसर्गजन्य आजार असतो त्वचारोग, फंगल इन्फेक्शन, मुरूम आणि सोयरासिस यासारखे विकार उद्भवू शकतात. डास चावल्याने डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया अशा आजारांचा प्रादुर्भाव वेगाने होत असतो. हे आजार टाळण्यासाठी घर व परिसर स्वच्छ ठेवणे महत्त्वाचे आहे. पावसाळ्यात साथरोग टाळण्यासाठी पौष्टिक आहार घेऊन रोगप्रतिकारशक्ती वाढवणे अत्यंत गरजेचे असल्याचे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी रेवती साबळे यांनी सांगितले.

बॉक्स

हे आहे पावसाळ्यातील आजार

डायरिया, कॉलरा, वाताचे विकार, सर्दी, खोकला, कावीळ, गॅस्ट्रो, लेप्टोस्पायरोसिस, चिकनगुनिया, मलेरिया, डेंग्यू त्वचारोग, फंगल इन्फेक्शन, मुरूम आणि सोयरासिस यासारखे अन्य साथरोग पावसाळ्यात उद्भवतात.या आजारापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी रोप प्रतिकारशक्ती वाढवणे गरजेचे आहे.

बॉक्स

अशी घ्या काळजी

पिण्याचे पाणी शक्यतो उकळून व थंड करून प्या.

रोगप्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या पदार्थांचे सेवन करा

आरात गाजर, हळद, लसूण आले, याचा आहारात, समावेश करा

डासांपासून बचावासाठी घर व आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा

सर्दी खोकला ताप थंडी अशी लक्षणे आढळल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ल्याने उपचार घ्या.

Web Title: Outbreaks appear to be exacerbated during this time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.