पॅनकार्ड क्लबचे कुलूप उघडले!

By admin | Published: April 19, 2016 12:01 AM2016-04-19T00:01:47+5:302016-04-19T00:01:47+5:30

पॉलिसी मॅच्युअर झाल्यानंतरही परतावा देण्यास विलंब करणाऱ्या ‘पॅनकार्ड क्लब’ या वित्तीय संस्थेचे कार्यालय अखेर सोमवारी उघडले ...

PanCard Club lock opened! | पॅनकार्ड क्लबचे कुलूप उघडले!

पॅनकार्ड क्लबचे कुलूप उघडले!

Next

ग्राहकांचा जीव भांड्यात : परतावा केव्हा ?
अमरावती : पॉलिसी मॅच्युअर झाल्यानंतरही परतावा देण्यास विलंब करणाऱ्या ‘पॅनकार्ड क्लब’ या वित्तीय संस्थेचे कार्यालय अखेर सोमवारी उघडले आणि हजारो ग्राहक-गुंतवणूकदारांचा जीव भांड्यात पडला.
भाडे न भरल्याने इमारत मालकाने कार्यालय उघडण्यास मज्जाव केल्याने सोमवार ११ एप्रिलपासून हे कार्यालय कुलूपबंद झाल्याचा दावा स्थानिक व्यवस्थापनाने केला होता. तथापि कंपनीने जाहीर खुलासा दिल्याने आणि त्यातच कार्यालय कुलूपबंद झाल्याने ग्राहकांमध्ये संतापाची लाट उसळली होती. ‘कार्यालय उघडून आमची रक्कम परत करा’, असा पवित्रा अनेक संतप्त ग्राहकांनी घेतला होता. त्यामुळे आता पुढे किती दिवस कंपनीचे स्थानिक कर्मचारी ग्राहकांच्या संतापाचा सामना करू शकतात, यावर या कार्यालयाचे भवितव्य अवलंबून आहे. दरम्यान मोठमोठी प्रलोभने दाखवून गुंतवणूक करवून घेत आता मात्र ‘आज या, उद्या या, आम्ही बोलावतोच, अशी आश्वासने न देता हा परतावा विनाविलंब द्यावा, अशी मागणी जोर धरु लागली आहे. क्लब, हॉटेल आणि रूमनाईट शेअरच्या माध्यमातून देशभर वित्तीय जाळे पसरविणाऱ्या ‘पॅनकार्ड क्लब’ कर्यालयाला टाळे लागल्याचे वृत्त ‘लोकमत’ ने १५ एप्रिलला प्रकाशित केले व कंपनी व्यवस्थापनासह एजंट, ग्राहक, गुंतवणुकदारांमध्ये खळबळ उडाली.

संतापाचा कडेलोट
अमरावती : प्रत्येक जण एजंट आणि संबंधितांकडे संपर्क साधू लागला. त्यावेळी तांत्रिक कारणामुळे कार्यालय बंद ठेवल्याचा दावा कंपनीच्या स्थानिक व्यवस्थापनाने केला.
प्रत्यक्षात मात्र संतापाचा कडेलोट झाल्याने कार्यालय बंद करण्याचा आरोप ग्राहक- गुंतवणूकदारांनी केला होता. ग्राहकांच्या या अस्वस्थतेला ‘लोकमत’ ने लोकदरबारात नेले. त्यावर कंपनीद्वारे परतावा देण्यास विलंब होत असल्याचे मान्य करीत सोमवारी कार्यालय उघडल्याचे सांगितले गेले. सोमवारी कार्यालय उघडताच शेकडो ग्राहकांनी पॅनकार्ड क्लबच्या बडनेरा रोड स्थित कार्यालयात रांगा लावल्या आणि परतावा देण्याची विनंती केली. दीड वर्षापासून पॅनकार्ड क्लबच्या बहुतांश ग्राहकांना मॅच्युरिटीची रक्कम मिळत नसल्याने आपण नागवले तर जाणार नाही ना? अशी भीती व्यक्त होत आहे. शहरातील सुमारे दोन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक धोक्यात आल्याने काही ग्राहक गुंतवणूकदार पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले होते. मात्र त्यांना परतावा देण्याचे आश्वासन देत माघार घेण्यास प्रवृत्त करण्यात आले. तुर्तास तक्रारीचे सत्र थांबले असले तरी परतावा न मिळाल्यास स्फोट होऊ शकतो. (प्रतिनिधी)

कंपनीची मालमत्ता विकण्यास परवानगी
ग्राहकांची रक्कम परत करण्याकरिता मालमत्ता विकण्यासाठी किंवा गहाण ठेवण्यासाठी पॅनकार्ड क्लबने ‘सॅट’ न्यायालयाकडे परवानगी मागितली. न्यायालयाने तशी परवानगी कंपनीला दिली आहे. प्रसंगी कंपनी मालमत्ता विकून ग्राहकांचे पैसे देईल, असा दावा कंपनीच्या स्थानिक ‘एजन्ट्स’नी केला आहे.

मार्केटिंग पर्सन्स करताहेत प्रयत्न!
ग्राहकांना विश्वासात घेऊन ग्राहकांची रक्कम त्वरित मिळण्याकरिता आम्ही प्रयत्न करतो आहोत. आम्हाला २१ महिन्यांपासून कमिशन मिळालेले नाही. ग्राहकांच्या रोषाला सामोरे जात आहोत. माध्यमांनी आम्हाला सहकार्य करावे, अशी अपेक्षा शेकडो मार्केटिंग पर्सन्सनी ‘लोकमत’ कडे व्यक्त केली आहे.

थकीत भाडे आणि सुट्यांमुळे गफलत
थकीत भाडे आणि लागोपाठ आलेल्या सुट्यांमध्ये पॅनकार्ड क्लबचे कार्यालय बंद होते. तशी सूचना तेथे लावण्यात आली होती. मात्र, कुणीतरी ही सूचना काढून हे कार्यालय नवीन जागेत जाणार असल्याची खोडसाळपणाची सूचना लावल्याचा दावा एस.आर.तसरे, व्ही.बी. वाकोडे, लांजेवार, उल्हे यांचासह मार्केटिंग पर्सननी केला.

Web Title: PanCard Club lock opened!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.