अमरावती: पूर्णा नदीपात्रात इसम गेला वाहून
By प्रदीप भाकरे | Published: September 9, 2022 08:15 PM2022-09-09T20:15:54+5:302022-09-09T20:19:21+5:30
गणेश विसर्जन करायला गेलेल्या इसम पूर्णा नदी पात्रात वाहून गेल्याची घटना घडली.
दर्यापूर (अमरावती): गणेश विसर्जन करायला गेलेल्या इसम पूर्णा नदी पात्रात वाहून गेल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास तालुक्यातील कळमगव्हाण येथे घडली.
तुळशीदास उंदराजी खंडारे (40, रा.कळमगव्हाण) असे नदीत वाहून गेलेल्या इसमाचे नाव आहे. ते ग्रामपंचायतीचे शिपाई होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली आहेत. ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नदी नाल्यांना प्रवाह आहे. याशिवाय अलीकडच्या दोन दिवसात ठिकठिकाणी पाऊस झाला असल्याने नदी दुथडी भरून वाहत आहे. नदीला बऱ्यापैकी पाणी असल्याने त्याच ठिकाणी अनेक गावांचे गणेश मूर्ती विसर्जन करण्यात येते.
त्यासाठी कळमगव्हाण येथील खंदारे गावकऱ्यांसमवेत आले होते.
पाय घसरल्याने प्रवाहात वाहत गेले. ग्रामस्थांनी रात्र होईपर्यंत शोध घेतला. पण त्यांना शोध लागलेला नाही. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन चमू जिल्ह्यात इतर ठिकाणी गुंतली असल्याने शनिवारी सकाळी शोध मोहीम राबविली जाईल,असे तहसीलदार योगेश देशमुख यांनी सांगितले.