लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : देशी बनावटी पिस्टल, जिवंत काडतूस व चाकू अमरावतीत विक्रीसाठी आणणाऱ्या दोन आरोपींना गुन्हे शाखेच्या पथकाने चित्रा चौकातून रविवारी पहाटे अटक केली. पवन राजाभाऊ देशमुख (२१, रा. शिक्षक कॉलनी, चांदूरबाजार) व मोहम्मद इमरान मोहम्मद जमील (३०, रा. नूरनगर, अमरावती) अशी अटक आरोपींची नावे आहेत.गुन्हे शाखेचे पोलीस गस्तीवर असताना दोन तरूणांनी घातक शस्त्र विक्रीसाठी शहरात आणल्याची गुप्त माहिती त्यांना मिळाली.चित्रा चौकात त्यांची ‘डिलींग’ होणार असल्याच्या माहितीवरून गुन्हे शाखेचे पीआय कैलास पुंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय राम गित्ते यांच्या नेतृत्वात एएसआय विनोद गाडेकर, प्रशांत वडनेरकर, राजू आप्पा बाहेनकर, जावेद अहमद, अजय मिश्रा, देवेंद्र कोठेकर, दीपक दुबे, मोहम्मद सुलतान, दिनेश नांदे, निवृत्ती काकड, राजेश बहिरट यांच्या पथकाने रविवारी पहाटे चित्रा चौकात सापळा रचला. दरम्यान पवन देशमुख व मोहम्मद इमरान हे दोघेही दुचाकीने चित्रा चौकात दाखल झाले. पोलिसांनी तत्काळ दोन्ही आरोपींना घेराव घालून ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्टल, ४ जिवंत काडतूस, चाकू आढळून आला. पोलिसांनी ते शस्त्र ताब्यात घेऊन दोघांनाही अटक केली.
पिस्टल, जिवंत काडतूस, चाकू विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2019 1:25 AM
देशी बनावटी पिस्टल, जिवंत काडतूस व चाकू अमरावतीत विक्रीसाठी आणणाऱ्या दोन आरोपींना गुन्हे शाखेच्या पथकाने चित्रा चौकातून रविवारी पहाटे अटक केली. पवन राजाभाऊ देशमुख (२१, रा. शिक्षक कॉलनी, चांदूरबाजार) व मोहम्मद इमरान मोहम्मद जमील (३०, रा. नूरनगर, अमरावती) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
ठळक मुद्देगुन्हे शाखेची कारवाई : दोन दुचाकी जप्त