महापालिका आयुक्तांचे प्लाझ्मा दान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:30 AM2020-12-12T04:30:28+5:302020-12-12T04:30:28+5:30
अमरावती : महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी प्लाझ्मा दान करून सामाजिक जाणिवेचा परिचय दिला. येथील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती ...
अमरावती : महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी प्लाझ्मा दान करून सामाजिक जाणिवेचा परिचय दिला. येथील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयात शुक्रवारी आयुक्तांनी प्लाझ्मा दान केला.
आयुक्त रोडे हे ४ सप्टेंबर रोजी कोराेना संक्रमित आढळले होते. ते दुसऱ्यांदा संक्रमित आढळल्याने त्यांनाही प्लाझ्मा लागला होता. कोविडमध्ये उपचारादरम्यान प्लाझ्माचे महत्त्व काय असते, याची जाणीव आयुक्तांना होती. त्यामुळे कोरोना संसर्गातून आपला जीव वाचला आता दुसऱ्यांचा जीव वाचावा, या भावनेतून त्यांनी प्लाझ्मा दान केले. प्लाझ्मा दान करण्यासाठी गुरुवारी रक्त नमुने घेण्यात आले. दरम्यान ॲन्टीबॉडीदेखील चांगली असल्याने प्लाझ्मा दान करण्याचा निर्णय घेतला. यावेळी पीडीएमसीचे अधिष्ठाता ए.टी.देशमुख, रक्तपेढीचे शफी शेख, डॉ. निकिता तऊर, सचिन काकडे, मनाेहर ठोंबरे, अतूल साबदे, राहुल गवई, हरीश खान, समीर कडू, संजय दहिकर, रक्तदान समितीचे महेंद्र भुतडा, अजय दातेराव आदी उपस्थित होते.
------------------------
मी दिलेल्या प्लाझ्माने कुणाचे जीव वाचत असेल, यापेक्षा वेगळे समाधान काय असावे?. कोरोना संक्रमित आल्यानंतर त्यातून सुखरु वाचलो. आता कोणाचे तरी जीव वाचवावे, हीच भावना आहे.
- प्रशांत रोडे, आयुक्त महापालिका.