पोर्टेबल ऑक्सिजन कॉम्प्रेसर इर्विन रुग्णालयात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:09 AM2021-06-21T04:09:50+5:302021-06-21T04:09:50+5:30

अमरावती : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे कुठे बेडची, तर कुठे ऑक्सिजनची कमतरता भासल्याने अनेकांना प्राणाला मुकावे ...

Portable Oxygen Compressor Irvine Hospitalized | पोर्टेबल ऑक्सिजन कॉम्प्रेसर इर्विन रुग्णालयात दाखल

पोर्टेबल ऑक्सिजन कॉम्प्रेसर इर्विन रुग्णालयात दाखल

Next

अमरावती : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे कुठे बेडची, तर कुठे ऑक्सिजनची कमतरता भासल्याने अनेकांना प्राणाला मुकावे लागले. या स्थितीतून बाहेर पडताना जिल्हा आरोग्य प्रशासनाला विविध समस्यांवर उपाययोजना करताना कमालीची कसरत करावी लागली. यात लोक प्रतिनिधीदेखील स्वस्थ बसले नव्हते. रात्रंदिवस समस्येवर तोडगा काढण्यासाठी केलेल्या प्रयत्नाचे फलित आता दिसू लागले आहे. त्यातच आमदार रवि राणा, खासदार नवनीत राणा यांनी भविष्यात अमरावतीकरांना ऑक्सिजनची कमतरता भासू नये, यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन, हरमन फिनोकेमचे मनहास यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. पोर्टेबल ऑक्सिजन कॉम्प्रेसरची मागणी मंजूर करवून घेतली. खसदार (सीएसआर) फंडातून ७६ लाख रुपये किमतीची ती मशिनरी चीनमधील गोंजू येथून खरेदी करण्यात आली. मुंबईपर्यंत जहाजाने व तेथील न्हावा सेवा बंदरातून ट्रकमध्ये येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात रविवारी कॉम्प्रेसर आणि ऑक्सिजन सिलिंडर दाखल झाले. ट्रकमधून खाली उतरविण्याकरिता युवा स्वाभिमानचे पदाधिकारी, कार्यकर्ते सतत प्रयत्नरत होते. यावेळी महिला पदाधिकाऱ्यांचीदेखील उपस्थिती होती. महाराष्टात हे एकमेव पोर्टेबल ऑक्सिजन कॉम्प्रेसर असल्याची माहिती कंपनीच्या इंजिनीअरनी दिली. लवकरच ऑक्सिजन प्लांट उभारणी व वॉर्डांत पाईपलाईनचे काम सुरू होणार असून, जिल्ह्यातील गोरगरीब जनतेच्या सेवेत सुरू करण्यात येणार असल्याचे युवा स्वाभिमानी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

बॉक्स

अशी होणार ऑक्सिजनची निर्मिती

पोर्टेबल ऑक्सिजन कॉम्प्रेसरच्या साह्याने हवेतून ऑक्सिजन निर्मिती होणार आहे. तसेच त्यात लिक्विडचीदेखील सोय करण्यात आलेली आहे. त्यामुळे टू इन वन म्हणून ते उपयोगात येऊ शकेल. यातून ६० एनएम ३ एच प्रकारचे प्रत्येकी ४० लिटर क्षमतेचे पीएसए प्रणालीचे २४० सिलिंडर २४ तासात निर्मिती होणार आहे. जिल्ह्यातील विविध भागासह सुपर स्पेशालिटी रुग्णालयातही आवश्यकतेनुसार येथे निर्मित होणारे ऑक्सिजनचा पुरवठा केला जाणार आहे.

कोट

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने जिल्ह्यातील नागरिकांना ऑक्सिजनअभावी जीव गमवावा लागला. त्यामुळे संभाव्य तिसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये, यासाठी खासदार नवनीत राणा यांच्या प्रयत्नाने हे पोर्टेबल ऑक्सिजन कॉम्प्रेसर अमरावतीत पोहचले आहे. यातून निर्माण होणारे ऑक्सिजन गरजेनुसार सुपर स्पेशालिटी रुग्णालयासह उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालयांमध्ये केला जाणार आहे. जेणेकरून जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून उपचारार्थ आलेल्या रुग्णांना ऑक्सिजन घेणे सोयीचे होणार आहे.

- रवि राणा,

आमदार, बडनेरा

Web Title: Portable Oxygen Compressor Irvine Hospitalized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.