लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विदर्भात बहुतेक ठिकाणी मध्यम ते भारी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. १६ व १७ जुलै रोजी काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञाने वर्तविली आहे.वायव्य बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र ठळक कमी दाबाचे क्षेत्रात परिवर्तीत झाले आहे. त्यांच्याशी संबंधित चक्राकार वारे आणि ही सिस्टीम पश्चिमेकडे सरकत आहे. ती १६ जुलैला विदर्भावरून पुढे जाईल, अशी शक्यता आहे. सोमवारी विदर्भात १ ते २ ठिकाणी १५० ते २०० मीमी. पाऊस पडू शकतो. दक्षिण गुजरातवर चक्राकार वारे कायम आहे. मान्सून ट्रफ उत्तर छत्तीसगडपर्यंत खाली आला आहे. या स्थितीमुळे १५ ते १७ जुलैदरम्यान विदर्भात बहुतेक ठिकाणी मध्यम ते भारी पावसाची शक्यता आहे. तर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे. त्याचप्रमाणे १८ ते १९ जुलै रोजी बऱ्याच ठिकाणी हलका व मध्यम पावसाची शक्यता आहे. श्री शिवाजी कृषि महाविद्यालयाचे हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांच्या अंदाजानुसार १५ व १६ जुलै रोजी तुरळक ठिकाणी मुसळधार तर १ ते २ ठिकाणी अतिशय मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
मुसळधार पावसाची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 11:00 PM
विदर्भात बहुतेक ठिकाणी मध्यम ते भारी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. १६ व १७ जुलै रोजी काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञाने वर्तविली आहे.
ठळक मुद्दे१६ १७ जुलै रोजीचा हवामानाचा अंदाज