कृषी विभागातील योजनांसाठी ५० लाख रूपये वाढीचा प्रस्ताव

By admin | Published: February 25, 2016 12:08 AM2016-02-25T00:08:33+5:302016-02-25T00:08:33+5:30

कृषी विभागा मार्फत शेतकऱ्यांना अनुदानावर पुरविण्यात येणाऱ्या विविध योजनांसाठी जिल्हा परिषदेच्या आगामी बजेट मध्ये सुमारे ५० लाख रूपयांची वाढीव तरतूद करावी,

Proposal for growth of 50 lakh rupees for schemes in the agriculture department | कृषी विभागातील योजनांसाठी ५० लाख रूपये वाढीचा प्रस्ताव

कृषी विभागातील योजनांसाठी ५० लाख रूपये वाढीचा प्रस्ताव

Next

जिल्हा परिषद : कृषी विषय समिती सभेत ठराव पारित
अमरावती : कृषी विभागा मार्फत शेतकऱ्यांना अनुदानावर पुरविण्यात येणाऱ्या विविध योजनांसाठी जिल्हा परिषदेच्या आगामी बजेट मध्ये सुमारे ५० लाख रूपयांची वाढीव तरतूद करावी, असा ठराव कृषी विषय समिती मध्ये बुधवारी घेण्यात आला आहे.
शेतकऱ्यांना ५० ते ७५ टक्के अनुदानावर पुरविण्यात येणाऱ्या सिंचन पाईप वाटप योजनेकरिता २० लाख, आॅईल पेट्रोल, केरोसीन डिझेल इंजिन करीता २० लाख आणि शेतकऱ्यांना पिक संरक्षण अवजारे पुरविण्यासाठी सुमारे १० लाख रूपये अशी एकूण ५० लाख रूपयांची वाढीव तरतूद आगामी जिल्हा परीषदेच्या बजेट मध्ये करावी, असा ठराव सभापती अरूणा गोरले यांनी मांडला. या ठरावास समिती सदस्यांनी एकमताने मंजूरी दिली आहे.
याशिवाय शेतकऱ्यांना सध्या ताडपत्री आणि पाईपचे वाटप अनुदानावर सुरू झाले आहे. याचा आढावा सभेत घेण्यात आला. सोबतच विशेष घटक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना साहित्य योजनेतून जे साहित्य वाटप केले जात आहे. त्यामधील लाभार्थी मयत असल्यास वारसा करीता प्रमाणपत्रासाठी लागू केलेली जाचक अटी दूर कराव्यात, विशेष घटक मधुन शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या बैलगाडी ऐवजी मिनी टॅक्टर देण्यात यावा, अशी सूचना सभापती विनोद टेकाडे यांनी सभेत केली याबाबत पाठपुरावा करण्याचे आश्वासन देण्यात आले. यावेळी कृषी विभागाच्या इतरही मुद्यावर चर्चा झाली. सभेला कृषी समितीच्या सभापती अरूणा गोरले, बाळकृष्ण चव्हाण, मंदा गवई, सभापती विनोद टेकाडे, सोनाली देशमुख, निता जिचकार, कृ षी विकास अधिकारी उदय काथोडे, वरूण देशमुख राऊत उपस्थिती होती. (प्रतिनिधी)

Web Title: Proposal for growth of 50 lakh rupees for schemes in the agriculture department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.