तूर, हरभऱ्यासाठी तात्पुरते गोदाम उपलब्ध करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 10:09 PM2018-06-06T22:09:04+5:302018-06-06T22:09:44+5:30

गोदाम नसल्याच्या सबबीखाली शासनाने शेतकऱ्यांची तूर, हरभरा खरेदी बंद केली. मात्र, सर्वच बाजार समित्यांमध्ये जागा उपलब्ध असल्यामुळे या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात गोदामाची उभारणी करून शेतमालाची खरेदी करण्यात यावी, अशी मागणी आ. यशोमती ठाकूर यांनी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्याकडे सोमवारी केली.

Provide temporarily warehouse for tur, turf | तूर, हरभऱ्यासाठी तात्पुरते गोदाम उपलब्ध करा

तूर, हरभऱ्यासाठी तात्पुरते गोदाम उपलब्ध करा

Next
ठळक मुद्देयशोमती ठाकूर : जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : गोदाम नसल्याच्या सबबीखाली शासनाने शेतकऱ्यांची तूर, हरभरा खरेदी बंद केली. मात्र, सर्वच बाजार समित्यांमध्ये जागा उपलब्ध असल्यामुळे या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात गोदामाची उभारणी करून शेतमालाची खरेदी करण्यात यावी, अशी मागणी आ. यशोमती ठाकूर यांनी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्याकडे सोमवारी केली.
शासनाने तूर खरेदी बंद केल्यामुळे जिल्ह्यातील ६५ हजारांवर शेतकºयांचे पाच लाख क्विंटलवर तूर व हरभरा घरी पडून आहे. प्रशासनाद्वारा गोदाम उपलब्ध नाही आदी सबबी सांगण्यात येत आहेत. सर्वच बाजार समित्यांमध्ये भरपूर जागा उपलब्ध असल्यामुळे या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात गोदामांची उभारणी करून समस्या सोडविली जाऊ शकते. अनेक साखर कारखान्यांमध्ये अशाच प्रकारे गोदामाची उभारणी करून साखरेची साठवणूक केली जाते याकडे आ. यशोमती ठाकूर यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. ही व्यवस्था अत्यंत कमी वेळात उपलब्ध करून दिल्यास शेतकऱ्यांच्या घरी व बाजार समितीच्या मार्केट यार्डामध्ये असलेल्या तूर व हरभऱ्याच्या खरेदी समस्या निकाली काढली जाऊ शकते. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांची आर्थिक अडचण भागविली जाऊ शकते. त्यामुळे सर्वच बाजार समित्यांच्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या जागीच तात्पुरत्या स्वरूपात गोदामाची उभारणी करावी, अशी मागणी आ. यशोमती ठाकूर यांनी केली.
जलपूजनाला डावलल्या जातेय, आरोप
तिवसा मतदारसंघात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत मंजूर असलेल्या कृषी, पाटबंधारे व जलसंपदा विभागाच्या अनेक कामे सुरू आहेत. स्थानिक आमदार तालुका समितीचे अध्यक्ष असताना डावलले जात असल्याचा आरोप आ. यशोमती ठाकूर यांनी सादर निवेदनात केला. तसेच कामे सुरू असताना स्थानिक लोकप्रतिनिधींनादेखील कामांची माहिती दिली जात नाही. त्यामुळे भूमिपूजन, जलपूजनाच्या वेळी आमदारांना पूर्वसूचना देऊन अवगत करावे, यासाठीचे निर्देश संबंधित यंत्रणेला द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली.

Web Title: Provide temporarily warehouse for tur, turf

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.