अमरावती : यशोदानगर क्रमांक १ येथे फ्रेजरपुरा पोलीस व गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकून जुगाराच्या साहित्यासह १५ हजार ५९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई गुरुवारी करण्यात आली.
अब्दुल नईम अब्दुल कदीर (४२, रा. जुनीवस्ती, बडनेरा), अजय शिवचरण गुप्ता (४४, रा. राजेंद्रनगर), राजू गणपत नेहर (६०, रा. बेलपुरा), राजू धनराज वानखडे ( रा. जेवडनगर), जगतपाल नथ्थूजी बोबडे (६०, रा. जयनगर), भारत छेदीलाल चौधरी ( रा. यशोदानगर), राजू कावळे (रा. यशोदानगर) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा शोध घेण्याकरिता शोधमोहीम राबविली. गस्तीदरम्यान पोलिसांना जुगार खेळताना आरोपी आढळून आले. त्यांच्या ताब्यातून ७६८० रुपये रोख तसेच इतर साहित्य असा एकूण १५,५९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पुढील तपास पोलीस करीत आहेत. ही कारवाई गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक जलालोद्दीन नजमोद्दीन सय्यद यांच्यासह पथकाने केली.