रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले

By admin | Published: February 28, 2016 12:34 AM2016-02-28T00:34:12+5:302016-02-28T00:34:12+5:30

भुसावळनजीक मालगाडीचे डबे रुळावरून घसरल्याने शनिवारी बडनेरा रेल्वेस्थानकावरून जाणाऱ्या बऱ्याचशा प्रवासी गाड्या रद्द करण्यात आल्या, ...

Railway schedule collapses | रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले

रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले

Next

भुसावळजवळ डबे घसरले : काही गाड्या रद्द, काही वळविल्या
बडनेरा : भुसावळनजीक मालगाडीचे डबे रुळावरून घसरल्याने शनिवारी बडनेरा रेल्वेस्थानकावरून जाणाऱ्या बऱ्याचशा प्रवासी गाड्या रद्द करण्यात आल्या, तर काही गाड्या वळविण्यात आल्याने प्रवाशांना मोठा मन:स्ताप सहन करावा लागला. दुपारनंतर मार्ग सुरळीत होईल, असे रेल्वेच्या सूत्राने सांगितले.
शनिवार २७ फेब्रुवारी रोजी भुसावळनजिक मालगाडीचे डबे रुळाखाली आल्याने या मार्गाहून जाणाऱ्या प्रवासी तसेच मालवाहू गाड्यांच्या फेऱ्या थांबल्यात. बडनेऱ्याहून भुसावळमार्गे जाणाऱ्या तसेच नागपूर मार्गाकडे धावणाऱ्या प्रवासी गाड्या वेळेपेक्षा बराच उशिरा धावल्या. हटीया, लोकमान्य टिळक एक्स्प्रेस, विशाखापट्टणम, नवजीवन एक्स्प्रेस, निजामुद्दीन, महाराष्ट्र एक्स्प्रेस यासह इतरही गाड्या नागपूरहून वळविण्यात आल्या तर अमरावती ते सुरत पॅसेंजर, भुसावळ ते नरखेड पॅसेंजर, नागपूर ते भुसावळ पॅसेंजर गाड्या रद्दच करण्यात आल्या. यासह नागपूर मार्गाकडे जाणाऱ्या बऱ्याचशा गाड्या उशिराने धावण्यात आल्यामुळे बडनेरा व अमरावती येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा मन:स्ताप सहन करावा लागला. बडनेरा रेल्वे स्थानकावर प्रवाशांची एकच झुंबड उडाली होती. दुपारनंतर प्रवासी गाड्या सुरळीत धावतील, असे रेल्वेच्या सूत्राकडून सांगण्यात आले. प्रवाशांना आपल्या तिकिटा रद्द करून इतर वाहनांनी प्रवास करण्याची वेळ या घटनेमुळे आली. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Railway schedule collapses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.