२१ जूनला दुर्मिळ कंकणाकृती सूर्यग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2020 03:49 PM2020-06-08T15:49:41+5:302020-06-08T15:50:36+5:30

येत्या २१ जूनला देशातील काही भागांतून कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार आहे, तर काही भागांतून खंडग्रास दिसणार आहे.

Rare bracelet-like solar eclipse on June 21 | २१ जूनला दुर्मिळ कंकणाकृती सूर्यग्रहण

२१ जूनला दुर्मिळ कंकणाकृती सूर्यग्रहण

Next
ठळक मुद्देमहाराष्ट्रात खंडग्रासउत्तर भारतात दिसणार

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : येत्या २१ जूनला देशातील काही भागांतून कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार आहे, तर काही भागांतून खंडग्रास दिसणार आहे.
उत्तराखंडच्या जोशी मठ, डेहराडून तसेच हरियाणाच्या कुरुक्षेत्र, पोहोवा, इटिया या भागातून सूर्यग्रहणाची कंकणाकृती स्थिती दिसणार आहे. देशाच्या इतर भागांतून खंडग्रास स्थिती दिसणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून हे ग्रहण खंडग्रास दिसेल. सकाळी १० ते १.२८ या काळात हे ग्रहण दिसणार आहे.
संपूर्ण आयुष्यात क्वचितच कंकणाकृती सूर्यग्रहण पाहण्याची संधी मिळते. कंकणाकृती सूर्यग्रहणात चंद्र पृथ्वीपासून जास्तीत जास्त दूर आणि सूर्य जास्तीत जास्त जवळ असतो. चंद्रबिंब सूर्यबिंबाला पूर्णपणे झाकू शकत नाही. अशावेळी चंद्राभोवती प्रकाशमान सूर्याची वतुर्ळाकार कडी बांगडीप्रमाणे दिसते. या कडीला रिंग आॅफ फायर असेसुद्धा म्हणतात. या ग्रहणाचा मानवी जीवनावर कुठलाही परिणाम होणार नसल्याने ग्रहणात जेवण करू नये, गर्भवती स्त्रीने त्याचे अवलोकन करून नये, ग्रहण झाल्यावर आंघोळ करावी, दान करावे अशा अंधश्रद्धा टाळाव्यात. मात्र, सूर्याकडे ग्रहण काळात साध्या डोळ्यांनी पाहू नये. काजळी लावलेली काच , उन्हाचा गॉगल, पाण्यातले प्रतिबिंब आदी प्रकारांतून ग्रहण पाहू नये, तर १४ क्रमांकाची वेल्डरची काच, एक्स फिल्म , विशेष सौर गॉगल यातून सूर्यग्रहण पाहावेस, अशी माहिती मराठी विज्ञान परिषदेच्या अमरावती विभागाचे अध्यक्ष प्रवीण गुल्हाने व हौशी खगोल अभ्यासक विजय गिरुळकर यांनी दिली.

Web Title: Rare bracelet-like solar eclipse on June 21

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.