शहरं
Join us  
Trending Stories
1
"2019 मध्ये यांच्यासाठी जो 'चौकीदार' चोर होता, तो आता 'ईमानदार' झाला..."; असं का म्हणाले पीएम मोदी?
2
EVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्यात, काँग्रेसच्या बैठकीत प्रियंका गांधींची मागणी
3
Mumbai Indians फिरवली पाठ, Ishan Kishan ने ठोकले ९ षटकार, अवघ्या २७ चेंडूत जिंकवली मॅच
4
बायडेन यांच्यासारखी मोदींची स्मरणशक्ती हरवत चालली हे राहुल गांधींचे वक्तव्य दुर्दैवी; परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया
5
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, किती दिवसांचा मुक्काम...
6
IPL Auction 2025: Rishabh Pant वर लागली २७ कोटींची तगडी बोली, टॅक्स कापून हातात किती मिळणार?
7
चंपाई सोरेन यांची JMM मध्ये घरवापसी होणार? 'कोल्हन टायगर'ला हेमंत सोरेन यांची ऑफर..?
8
टीम इंडियाने लाँच केली नवी जर्सी, झाला महत्त्वाचा बदल; पहिल्यांदा कधी मैदानात कधी दिसणार?
9
वक्फ बोर्डच्या १० कोटींच्या निधीबाबत देवेंद्र फडणवीसांचे ट्विट; म्हणाले, "नवीन सरकार येताच..."
10
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
11
मोठी बातमी! फोक्सवॅगनने १.४ अब्ज डॉलर कर चोरला; आधीच संकटात, त्यात भारताने पाठविली नोटीस : रिपोर्ट
12
शेअर असावा तर असा...! 4 वर्षांत दिला 10000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; ₹1000 वर पोहोचला भाव
13
Ayush Badoni ची कॅप्टन्सी! प्लेइंग इलेव्हनमधील सर्वांनी गोलंदाजी करत सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
14
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
15
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
16
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
17
रश्मिका मंदानाने केला 'सामी सामी' वर डान्स, हटके ब्लॅक साडीत दिसतेय हॉट!
18
एकनाथ शिंदे नाही, तर कोण? शिवसेनेतून उपमुख्यमंत्रिपदासाठी 'या' 5 नावांची चर्चा...
19
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"
20
Samantha Ruth Prabhu: समंथा रुथ प्रभूच्या वडिलांचं निधन, अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट

ठिपकेदार कस्तुर पक्ष्याची महाराष्ट्रातील छायाचित्रासह नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 4:13 AM

अमरावती : विदर्भातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत पूर्व घारगड बीटमध्ये गजेंद्र बावने, अजय लहाने श्याम म्हस्के राहुल गुप्ता व मनोज ...

अमरावती : विदर्भातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत पूर्व घारगड बीटमध्ये गजेंद्र बावने, अजय लहाने श्याम म्हस्के राहुल गुप्ता व मनोज बिंड यांना ७ मार्च रोजी निसर्ग भ्रमंती व वन्यजीव छायाचित्रण करताना अत्यंत दुर्मीळ अशा 'ठिपकेदार कस्तुर' पक्ष्याची छायाचित्रासह महत्त्वपूर्ण नोंद करण्यात यश आले.

सर्व कस्तुर वर्गीय पक्ष्यांमध्ये हा ठिपकेदार कस्तुर अधिक आकर्षक दिसतो.या पक्ष्याचे इंग्रजी नाव 'स्केली थ्रश' असे असुन शास्त्रीय नाव झ्यूथेरा डॉमा असे आहे.वनभ्रमंती दरम्यान इतर पक्ष्यांचे निरीक्षण करतांना अचानक झाडीतून नदी काठच्या उंच झाडावर हा पक्षी येऊन बसला.याच्या अंगावरील वेगळ्या ठिपक्यांमूळे लगेच लक्ष गेल्यावर याचे छायाचित्र काढण्यात आले . साधारणपणे या पक्ष्याची लांबी २७ ते ३१ से.मी. भरते याच्या शरीरावर फिकट पिवळसर रंगावरील छोट्या छाेट्या रेषासदृश्य ठिपक्यांची रचना ही याची मुख्य ओळखीची खुण आहे .पोटाचा भाग पांढरा असुन त्यावरही ठिपके असतात व पाय फिकट नारींगी गुलाबी असतात.सतत कूजन न करणारा हा पक्षी अधूनमधून ५ ते १० मिनीटाच्या अंतराने टवि -टू-टू अशी स्पष्ट आणि तीव्र शीळ सूध्दा घालतो.हा पक्षी अतीशय लाजाळू असल्यामूळे फारसा उघड्यावर सहज येत नसल्यामूळे सहज दृष्टीस पडत नाही.घनदाट अरण्य आणि गर्द झाडांमध्येच याचे अस्तित्व अाढून येते .त्यामुळे याला शोधने फार कढीन आणि संयामाचे काम आहे असते . यावे नर आणि मादी हे दिसायला सारखेच असुन मादी ही छोट्या वाटीसारख्या खोलगट घरट्यात ३-४ राखाडी हिरवट रंगाची अंडी घालते.सामान्यपणे छोटे कीटक आणि कृमी हे यांचे खाद्य असुन याच्या दृर्मिळतेमूळे फारशी सविस्तर माहीती उपलब्ध होत नाही व याला अधाप प्रमाणित मराढी नामनीधान सुध्दा प्राप्त झालेले नाही.मलेशीयसह हा पक्षी भारताच्या केचळ उत्तर भागात हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड येथे आढळून येतो .ई - बर्ड या सारख्या जागतीक दर्जाच्या संकेतस्थाळावर उपलब्द असलेल्या माहीतीनुसार या पक्ष्याची ही महाराष्ट्रातील छायाचित्रासह खात्रीशीर अशी प्रथमच नोंद ढरली आहे.

मेळघाट वनपरिक्षेत्राचे एसीएफ आवारे व आरएफो वाकोडे यांच्या निंरतर आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्याच्या वृत्ती व प्रयत्नांमुळे मेळघाटची जौवविवीधतता वाढीस लागली आहे. त्यांना सुध्दा प्रत्यक्ष भेटीअंती या पक्ष्याच्या महत्वपूर्ण नोंदविषयी माहीती देण्यात आली .वाघ आणि इतर वन्यजीव या करीता सुप्रसीध्द असलेले मध्यभारतातील मेळघाट चे जंगल हे कित्येक दृर्मीळ विवीध वनस्पती ,सरिसृप वर्गिय प्राणी आणि पक्ष्यांकरीता राष्ट्रीयस्तावर प्रसीद्ध होऊ पहात आहे. त्यामूळे व्याघ्रदर्शनाची आस घेऊन येणारे पर्यटक ,अभ्यासक आणि संशोधक यांनी मेळघाटच्या या जौवविवीधतेतीची सुध्दा योग्य दखल घेऊन मेळघाट परीसरातील निसर्गाचा असा विवीधांगी अास्वाद घेणे महत्वाचे असल्याचे मत मनोज बिंड यांनी वृत्तपत्र प्रतीनीधीजवळ व्यक्त केला आहे