हरविलेले मोबाईल नागरिकांना परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 11:52 PM2018-04-30T23:52:15+5:302018-04-30T23:53:42+5:30

Return to the lost mobile people | हरविलेले मोबाईल नागरिकांना परत

हरविलेले मोबाईल नागरिकांना परत

googlenewsNext
ठळक मुद्देमिसिंग मोबाईल : सायबर पोलिसांकडून ट्रेस, ३० जणांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : हरविलेले मोबाइल ट्रेस करून शोधलेले ३० मोबाइल सायबर पोलिसांनी सोमवारी नागरिकांना परत केले. पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्या हस्ते ते मोबाइल संबंधित नागरिकांच्या स्वाधीन करण्यात आले. १ एप्रिल रोजी सायबर ठाणे सुरू झाल्यानंतर पोलिसांनी ३० मोबाइल ट्रेस करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.
शहर पोलीस आयुक्तालयातील सभागृहात सोमवारी मिसिंग मोबाइल परत करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सायबर ठाण्याच्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महिनाभरात हरविलेल्या मोबाइलचे शोधकार्य केले. मोबाईल ट्रेस करून ते वापरणाऱ्या नागरिकांकडून जप्त केले. जप्त केलेल्या ३० मोबाइलची किंमत ३ लाख ३५ हजार ४४८ रुपये आहे. मागील दोन वर्षांत शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतून ७०० च्या जवळपास नागरिकांचे मोबाईल हरविले आहेत. या मोबाइलचा शोध सायबर ठाण्याचे पोलीस करीत असून सद्यस्थितीत ३० मोबाईल ट्रेस करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.
बहुतांश मोबाइल नागपुरी गेट हद्दीतून जप्त
हरविलेले मोबाइल ट्रेस झाल्यानंतर त्यापैकी सर्वाधिक मोबाइल नागपुरी गेट व खोलापुरी गेट हद्दीतील नागरिकांजवळ असल्याचे निदर्शनास आले. सायबर पोलिसांनी संबंधित व्यक्तींकडून ते मोबाइल जप्त करण्यात आले. याच परिसरात बहुतांश मोबाइल चोर आढळून आले असून, हे मोबाइल हरविलेले होते की, चोरण्यात आले याबाबत संभ्रम कायम आहे.
ट्रेसिंगसाठी सायबर टीमचे परिश्रम
हरविलेले मोबाईल ट्रेस करणाऱ्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांचा पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी सत्कार केला. सहायक पोलीस निरीक्षक कांचन पांडे यांच्यासोबतच पोलीस उपनिरीक्षक ईश्वर वर्गे, पोलीस शिपाई सुधीर चर्जन, सचिन भोयर, गोपाल सोळंके यांनी अथक परिश्रम घेतले.
यांना मिळाले मोबाईल
संदीप भादर्गे, नितू वाघमारे, जितेंद्र शर्मा, सचीन गुप्ता, खुशबु साहू, अभिजीत रहाटे, सुरेश मालाणी, प्रशांत हाडे, ऋषिकेश राठी, राहुल कोंडे, अशलेश चौधरी, अशोक वाटेकर, दिलीप आहुजा, आदित्य खंडलेवार, आदीत्य कोरडे, सौरभ निगोंट व मुकुंद इंदुरकर यांना सोमवारी मोबाईल परत करण्यात आले.

Web Title: Return to the lost mobile people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.