शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंमुळे अदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
3
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली
4
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विजयाचा 'गोडवा', 'जिलेबी सेलिब्रेशन' अन् महायुतीच्या नेतेमंडळींचा तुफान जल्लोष
5
Dahanu Vidhan Sabha Election Result 2024 Live : भगव्या वादळात फडकले लाल निशाण, डहाणूत माकपचे विनोद निकोले विजयी
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : "निकाल येतील जातील...; तुमचा 'राजूदादा' ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती"
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : आर आर आबांच्या रोहितने मैदान मारलं; सर्वात कमी वयाचे आमदार
8
विकास, सुशासन, जय महाराष्ट्र...! राज्यातील महायुतीच्या विजयावर काय म्हणाले PM मोदी? हेमंत यांचंही केलं अभिनंदन
9
महाराष्ट्रात मोठा विजय मिळवणाऱ्या भाजपाचा झारखंडमध्ये दारुण पराभव, 'इंडिया'चा निर्विवाद विजय
10
"अनपेक्षित आणि अनाकलनीय निकाल’’, दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
11
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: सब से बडे खिलाडी! सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील १० ‘महारथी’
12
Maharashtra Assembly Election Result 2024: भाजप आणि महायुतीला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना हे सडेतोड उत्तर, अशोक चव्हाणांचा विरोधकांना टोला
13
Dindoshi Assembly Election: संजय निरुपम पराभूत; निकराच्या लढतीत सुनील प्रभू विजयी
14
महायुतीच्या विजयामुळे गौतम अदानींना अच्छे दिन? धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मार्ग मोकळा...
15
Maharashtra Election Results: देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री झालेलं बघायचं का? दिवीजा फडणवीस म्हणाली...
16
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते का? अमृता फडणवीस म्हणाल्या...
17
काँग्रेसला मोठा धक्का, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव, कराड दक्षिणेत अतुलपर्व!
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : भाजपचा एक डाव अन् दोन राज्यांत काँग्रेसचा 'सुपडा साफ'! गेम चेंजर ठरला हा प्लॅन 
19
उत्तर प्रदेशमध्ये योगींचा जलवा, पोटनिवडणुकीत भाजपाचा दणदणीत विजय, सपाला धक्का 
20
शिंदेंचा शिलेदार ठरला संगमनेरमध्ये जायंट किलर; थोरातांना पराभूत करणारे अमोल खताळ कोण आहेत?

बियाण्याच्या दरात वाढ कांदा नुकसान भरून काढणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 5:00 AM

सर्वसाधारणपणे पथ्रोट, अंजनगाव, अचलपूर, चांदूर बाजार तसेच अकोला जिल्ह्यातील अकोट परिसरातील शेतकरी हे पूर्वीपासून पांढरा कांदा बियाण्याचे उत्पादन घेतात. घोपाट फुलातून बी गोळा करणे, एप्रिल ते सप्टेंबर या काळात साठवण ही जिकरीची कामे आहेत. त्यामुळे या भागातील ठरावीकच शेतकरी कांदा बियाण्याचे उत्पादन घेतात.

ठळक मुद्देपायलीला ३००० रुपये : एकीकडे कांद्याची दरवाढ, दुसरीकडे बियाणे महागले

लोकमत न्यूज नेटवर्कअंजनगावसुर्जी : एकीकडे कांद्याच्या दरवाढीने गृहिणी हवालदिल झाल्या आहेत, तर दुसरीकडे पांढऱ्या कांद्याचे बियाणे (घोपाट) दरात विक्रमी वाढ झाल्याने कांदा उत्पादक हवालदिल झाले आहेत. हे बियाणे प्रतिकिलो १,२५० ते १,५०० रुपये आणि एक पायली बियाणे ३ हजार रुपये दराने विक्री होत आहे. भावातील तेजीमुळे खरिपातील पिकांचे नुकसान भरून काढण्यासाठी कांदा लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल आहे.सर्वसाधारणपणे पथ्रोट, अंजनगाव, अचलपूर, चांदूर बाजार तसेच अकोला जिल्ह्यातील अकोट परिसरातील शेतकरी हे पूर्वीपासून पांढरा कांदा बियाण्याचे उत्पादन घेतात. घोपाट फुलातून बी गोळा करणे, एप्रिल ते सप्टेंबर या काळात साठवण ही जिकरीची कामे आहेत. त्यामुळे या भागातील ठरावीकच शेतकरी कांदा बियाण्याचे उत्पादन घेतात. गतवर्षी कांद्याचे दर गगनाला भिडल्याने व बियांचा कांदा न मिळाल्याने घोपाटाची कमी प्रमाणात लागवड झाली. लागवड झालेल्या घोपाटाच्या फुलांचे यावर्षी परागीकरण न झाल्याने कांदा बियाण्यांचे उत्पादन कमी प्रमाणात झाले आहे. त्यामुळे कांदा बियाण्याच्या दरात यंदा विक्रमी वाढ झाली.अतिवृृृृष्टीमुळे विहिरी व कूपनलिकेतून सिंचनाकरिता पाणी हमखास मिळण्याची खात्री कांदा उत्पादकांना आहे. याशिवाय खरिपाची मूग, उडीद, सोयाबीन ही पिके हातची गेल्याने रबी कांदा लागवडीकडे बागायतदार शेतकºयांचा कल दिसत आहे.सद्यस्थितीत कृषिसेवा केंद्रांवर खासगी कंपनीचे पांढºया कांद्याचे ५०० ग्रॅम बियाणे ६००, तर लाल कांद्याचे बियाणे ५५० रुपयांच्या आसपास आहे. परंतु, या बियाण्यांबाबत दुकानदारच खात्री देत नाहीत. बियाणे खरेदीबाबत सावध राहावे, असा सल्ला जाणकार शेतकºयांनी दिला आहे.बियाणे खरेदीची लगबगसाधारणत: सप्टेंबरचा शेवटचा आठवडा ते अष्टमीपर्यंत रोवणीचा काळ असल्याने सर्व शेतकºयांनी कांदा बियाणे खरेदी सुरू केली आहे. शेतकरी कंपन्यांऐवजी इतर शेतकºयांकडील खात्रीशीर बियाण्यांवर विश्वास ठेवतात. कारण बियाणे न उगवल्यास विक्रेता शेतकरी प्रसंगी पैसेही परत करतो. यंदा चणा, गहू, सूर्यफूल, करडई, जवस, वाटाणा, तीळ या रबी पिकांच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सोबत बियाणे दरवाढीची भीती व्यक्त होत आहे.यंदा अतिवृृृष्टी झाल्याने ओलिताकरिता मुबलक पाणी उपलब्ध आहे. याशिवाय कांद्याच्या दरात वाढ झाल्याने शेतकºयांचा लागवडीकडे कल आहे.- संजय नाठे,शेतकरी, अंजनगाव सुर्जी

टॅग्स :agricultureशेती