काटआमला पुलाला जोडणारा रस्ता खचला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 05:00 AM2020-07-27T05:00:00+5:302020-07-27T05:01:05+5:30

बडनेरापासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावरील काटआमला गावानजीक शिवणी बु. मार्गे मोठा नाला वाहतो. त्यावरील खोलगट पुलाचा रस्ता एका बाजूने खचला आहे. त्यामुळे परिसरातील गावांकरिता हा पूल धोक्याचा झाला आहे. दोन दिवसांपूर्वी लगतच्या पारधी बेड्यावरील दुचाकीस्वार वाहनासह नाल्यात पडले. सुदैवाने ते पाण्याच्या बाहेर आले. खचलेला रस्ता एका पावसातच पूर्णपणे वाहून जाईल, अशी स्थिती आहे.

The road connecting us to the bridge was cut | काटआमला पुलाला जोडणारा रस्ता खचला

काटआमला पुलाला जोडणारा रस्ता खचला

googlenewsNext
ठळक मुद्देप्रशासन सुस्त : शहरानजीकच्या रस्त्याला अवकळा; मोठे भगदाड पडले, ग्रामस्थांना अपघाताची भीती

श्यामकांत सहस्त्रभोजने ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बडनेरा : काटआमला ते शिवणी बु. यांसह बऱ्याच गावांना जोडणाºया पुलालगतचा रस्ता खचल्याने तेथे मोठे भगदाड पडले आहे. यामुळे एक वर्षापूर्वीच्या अपघाताच्या पुनरावृत्तीची भीती ग्रामस्थांमध्ये घर करून आहे. प्रशासनाने मात्र रस्त्याच्या दुरुस्तीसाठी कुठलेही पाऊल उचललेले नाही.
बडनेरापासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावरील काटआमला गावानजीक शिवणी बु. मार्गे मोठा नाला वाहतो. त्यावरील खोलगट पुलाचा रस्ता एका बाजूने खचला आहे. त्यामुळे परिसरातील गावांकरिता हा पूल धोक्याचा झाला आहे. दोन दिवसांपूर्वी लगतच्या पारधी बेड्यावरील दुचाकीस्वार वाहनासह नाल्यात पडले. सुदैवाने ते पाण्याच्या बाहेर आले. खचलेला रस्ता एका पावसातच पूर्णपणे वाहून जाईल, अशी स्थिती आहे.
खरबी, दाढी-पेढी, लहान-मोठी शिवणी, टाकळी, बहादरपूर, बहिलोलपूर अशा गावांना याच पुलावरून जावे लागते. दररोज बडनेरा किंवा अमरावतीला कामकाजासाठी शेकडो लोक, विद्यार्थी हा पूल ओलांडून जात असतात तसेच शेतीच्या कामासाठी जाणाऱ्यांची संख्यादेखील बरीच आहे. पाऊस आला की, हा पूल ओसंडून वाहतो. तासन्तास लोकांना अडकून राहण्याची वेळ येते. त्यामुळे गंभीर अवस्था झालेल्या पुलाचे काम केव्हा करणार, याची प्रतीक्षा परिसरातील ग्रामस्थांना आहे.

वर्षभरापूर्वी दोन चिमुकले गेले वाहून
एक वर्षापूर्वी बडनेराहून बहादरपूर येथे जाणाºया दुचाकीस्वारांचा याच खोलगट पुलाने घात केला. एका व्यक्तीला दोन्ही चिमुकले गमवावे लागले. पुलाच्या चुकीच्या बांधणीचा मुद्दा तेव्हा चर्चेत होता. ग्रामस्थांंच्या संतप्त प्रतिक्रियांवर राजकारण्यांनी आश्वासने देऊन मागील निवडणूक पार पाडली. मात्र, पुलाच्या पुनर्निर्मितीचे काम सुरू होण्यास मुहूर्त अद्याप सापडला नाही.

पूल ओलांडून शेतात जावे लागते. पुलाला जोडणारा रस्ता खचला आहे. पावसात हा भाग दिसतच नाही. नव्याने पूल व रस्ता निर्मिती करावी.
- अंकुश वडे,
शेतकरी, काटआमला

यंदाच्या पावसाळ्यात रस्त्यासह पुलालादेखील मोठा धोका आहे. आम्ही जीव मुठीत घेऊनच ये-जा करतो. ग्रामवासी घाबरले आहेत. रस्त्याचे काम नव्याने करावे.
- सुनील मालधुरे, काटआमला

Web Title: The road connecting us to the bridge was cut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.