बायोडिझेल म्हणून औद्योगिक तेलाची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:10 AM2021-07-02T04:10:20+5:302021-07-02T04:10:20+5:30

अचलपूर : परतवाडा रोडवरील अष्टमासिद्धी फाट्याजवळील बायोडिझेलच्या नावावर औद्योगिक तेल विकणाऱ्या केंद्रावर धाड टाकून ते सील करण्याची कारवाई अचलपूर ...

Sale of industrial oil as biodiesel | बायोडिझेल म्हणून औद्योगिक तेलाची विक्री

बायोडिझेल म्हणून औद्योगिक तेलाची विक्री

Next

अचलपूर : परतवाडा रोडवरील अष्टमासिद्धी फाट्याजवळील बायोडिझेलच्या नावावर औद्योगिक तेल विकणाऱ्या केंद्रावर धाड टाकून ते सील करण्याची कारवाई अचलपूर तहसील कार्यालयाच्यावतीने करण्यात आली. जिल्ह्यातील ही पहिलीच कारवाई आहे.

अष्टमासिद्धीजवळील नंदकेश्वर औद्योगिक व तेल विक्री केंद्र आणि कृषी उपकरणे केंद्र आहे. अमीन साहेबराव फुंडकर (रा. कीर्तीनगर, अकोला) यांच्या मालकीच्या या प्रतिष्ठानातून मागील अनेक दिवसांपासून बायोडिझेलची विक्री करीत होते. सदर प्रतिष्ठानात पुरवठा विभागाचे निरीक्षण अधिकारी शैलेश देशमुख हे सहकाऱ्यांसमवेत तपासणीसाठी गेले होते. बायोडिझेल विक्री परवान्याबाबत विचारणा केली असता, त्यांच्याकडे कोणताही अधिकृत कागदपत्रे नव्हती. बायोडिझल म्हणून विकत असलेला द्रव पदार्थ औद्योगिक तेल निघाले. अनेक दिवसांपासून बायोडिझेलच्या नावावर ते ग्राहकांना खपविण्याचा गोरखधंदा येथे चालत होता. कथित बायोडिझेलचे नमुने घेऊन ते तपासणीकरिता पाठविण्यात आले असून, सदर प्रतिष्ठान सील करण्यात आले आहे. तहसीलदार मदन जाधव यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली.

------------

काय आहे औद्योगिक तेल?

मशीनरी (मशीन, उपकरणे इत्यादी) वंगण घालण्यासाठी उद्योगात आणि घरांमध्ये वापरल्या जाणाऱ्या पेट्रोलियम तेल हे . बाकू, एम्बा आणि पूर्व प्रकारचे क्रूड तेल त्यांच्या उत्पादनामध्ये वापरले जाते. औद्योगिक तेले प्रकाश, मध्यम आणि जड प्रकारच्या मध्ये चिकटपणानुसार विभाजित केल्या जातात

010721\img-20210701-wa0129.jpg

अचलपुरात अवैध रीत्या बायोडिझेल विकणारे केंद्राल

Web Title: Sale of industrial oil as biodiesel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.