शिष्यवृत्तीची परीक्षा आता २३ मे रोजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:14 AM2021-04-08T04:14:12+5:302021-04-08T04:14:12+5:30
अमरावती : पूर्व उच्च माध्यमिक आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. २५ एप्रिलला होणारी ही ...
अमरावती : पूर्व उच्च माध्यमिक आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. २५ एप्रिलला होणारी ही परीक्षा आता २३ मे रोजी होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. शालेय जीवनात शिष्यवृत्ती परीक्षेला विशेष असे महत्त्व आहे.
पूर्वी ही परीक्षा चौथी आणि सातवीच्या वगार्साठी घेतली जात होती. यात बदल करण्यात आला असून आता हीच परीक्षा पाचवी आणि आठवीच्या वर्गातील मुला-मुलींसाठी घेण्यात येत आहे. या परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या दैनंदिन शिक्षणासोबतच अन्य घडामोडीबाबत ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त अशी आहे. परिणामी या परीक्षेसाठी विद्यार्थी सहभागी होत असतात जिल्ह्यातील ज्या शाळांमधून पाचवी, आठवी विद्यार्थी विद्यार्थिनी परीक्षेसाठी प्रविष्ट होतील. त्यांच्या नावाची यादी शाळेच्या मुख्याध्यापकांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला पाठविण्यात येते. यानंतर ही यादी अंतिम करून शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येत असते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
बॉक्स
कोरोनाचे कारण देत परीक्षा लांबली
कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचा त्रास शालेय विद्यार्थ्यांना होऊ नये, यासाठी ही परीक्षा पुढे ढकलण्याचे नियोजन करण्यात आले आहे. कोरोनाचा पहिला टप्पा कमी झालेला नाही. सुरक्षितता म्हणून केवळ तारीख पुढे ढकलण्यात आलेली आहे. ही परीक्षा मे महिन्यात होणार असली तरी त्यात बदल होऊ शकतो.
परीक्षेच्या दृष्टिकोनातून परीक्षार्थी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी अभ्यास सुरू केला होता. पण आता ही परीक्षा पुढे ढकलण्याचे नियोजन केल्यामुळे अभ्यासाला वेळ मिळणार आहे.