उमरखेड येथील शाळा वादळाने जमीनदोस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 01:40 AM2018-06-08T01:40:53+5:302018-06-08T01:40:53+5:30

तालुक्यातील उमरखेड येथे १ जून रोजी आलेल्या वादळी पावसाने जि.प. प्राथमिक शाळेवरील सर्व टिनपत्रे उडून शाळा इमारत क्षतिग्रस्त झाली. याची माहिती मिळताच शिक्षणाधिकारी रामभाऊ तुरणकर हे ६ जून रोजी गटशिक्षणाधिकारी वासुदेव पुनसे यांना सोबत घेऊन उमरखेड शाळेची पाहणी केली.

School of Ummarkhed rammed into the storm | उमरखेड येथील शाळा वादळाने जमीनदोस्त

उमरखेड येथील शाळा वादळाने जमीनदोस्त

Next
ठळक मुद्देशिक्षणाधिकाऱ्यांचे निर्देश : नवीन वर्गखोल्या, पर्यायी व्यवस्था करा

लोकमत न्यूज नेटवर्क
मोर्शी : तालुक्यातील उमरखेड येथे १ जून रोजी आलेल्या वादळी पावसाने जि.प. प्राथमिक शाळेवरील सर्व टिनपत्रे उडून शाळा इमारत क्षतिग्रस्त झाली. याची माहिती मिळताच शिक्षणाधिकारी रामभाऊ तुरणकर हे ६ जून रोजी गटशिक्षणाधिकारी वासुदेव पुनसे यांना सोबत घेऊन उमरखेड शाळेची पाहणी केली. विद्यार्थ्यांकरिता नवीन वर्गखोल्या बांधा तसेच पर्यायी व्यवस्था करा, असे निर्देश त्यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले.
उमरखेड-लाखारा गावातील जि.प. प्राथमिक शाळेची इमारत जीर्ण झाली असून, ती केव्हा पडेल, याचा नेम नाही. पं.स.च्या मासिक सभेत बीडीओ सुरेश थोरात यांच्यापुढे हा विषय सभापती शंकर उईके, उपसभापती सुनील कडू, भाऊराव छापाने, माया वानखडे, यादवराव चोपडे, वीणा वानखडे, रूपाली पुंड, जया कळसकर, जि. प. सदस्य अनिल डबरासे आदींनी मांडला. यानंतर शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याकडे नवीन शाळा इमारत बांधण्याची मागणी केली होती. १ जून रोजी अचानक वादळी पाऊस आल्याने शाळेवरील सर्व टिनपत्रे उडाली आणि भिंती खचल्या. यामुळे विद्यार्थ्यांना बसण्यासाठी जागाच राहिली नाही. सुदैवाने शाळेला सुटी असल्याने प्राणहानी नाही. सभापती शंकर उईके, भाऊराव छापाणे यांनी शाळा त्वरित बांधकाम दुरूस्ती करून विद्यार्थ्यांची बसण्याची सोय करावी, अशी मागणी गावकºयांच्यावतीने पुन्हा केली. त्यावरून शिक्षणाधिकारी रामभाऊ तुरणकर यांनी भेट देऊन वर्गखोल्या पुन्हा बांधण्याचे आदेश दिले आहेत.

Web Title: School of Ummarkhed rammed into the storm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा