सिनेट सभा ऑनलाईन की, ऑफलाईन? सदस्यांमध्ये खल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:30 AM2020-12-12T04:30:12+5:302020-12-12T04:30:12+5:30
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात तब्बल वर्षभराने २८ डिसेंबर रोजी होऊ घातलेली सिनेट सभा ऑनलाईन की, ऑफलाईन? कशा ...
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात तब्बल वर्षभराने २८ डिसेंबर रोजी होऊ घातलेली सिनेट सभा ऑनलाईन की, ऑफलाईन? कशा प्रकारे आयोजित करावी, यासंदर्भात प्रशासनाचे एकमत झाले नाही. मात्र, सिनेट सभा ऑफलाईन? घ्यावी, अशी बहुतांश सदस्यांची मागणी आहे. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिनेट सभेबाबत गाईडलाईनसाठी जिल्हाधिकार्यांना पत्र पाठविले आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची गाईडलाईन अप्राप्त आहे.
मार्चपासून काेरानामुळे विद्यापीठाचे शैक्षणिक कामकाज ठप्प आहे. गतवेळी जानेवारीत झालेल्या सिनेट सभेचे कार्यवृत्तांत अदयापही पुढे सरकले नाही. अनेक प्रकरणांची चौकशी अपूर्ण आहे. काही प्रकरणांचे अहवाल सिनेट सदस्यांना पोहचले नाहीत. आता सिनेट सभा २८ डिसेंबर रोजी होत असल्याने जुन्या सभेत झालेल्या निर्णयाची माहिती, प्रशासनाला जाब विचारण्यासाठी सभा ऑफलाईन घेणे महत्त्वाचे आहे. त्याअनुषंगाने नुटा संघटनेनेे ऑफलाईन सभेची मागणी केली आहे. ऑनलाईन सभेत प्रश्न विचारता येत नाही. समोरील व्यक्ती कोणते उत्तर देते हे कळत नाही. अपहार, घोटाळे आदी प्रकरणांचे चौकशी अहवाल आणि कारवाईबाबत मागील सभेत झालेल्या निणर्याची विचारणा ऑनलाईन करणे अशक्य आहे. त्यामुळे सिनेट सभा ऑफलाईन घ्यावी, अशी बहुतांश सदस्यांची मागणी वजा सूर आहे.
-------------------
कोट
नुटा संघटनेने यापूर्वीच सिनेट सभा ऑफलाईन घ्यावी, असे पत्र कुलगुरूंना दिले आहे. आता कोरोना संसर्गाची फारशी भीती नाही. रुग्णसंख्याही ओसरत चाचली आहे. त्यामुळे सिनेट सभा ऑफलाईन घेण्यास काहीही हरकत नाही.
- विवेक देशमुख, सिनेट सदस्य, विद्यापीठ.
---------------------
आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू आहे. त्यामुळे सिनेट सभेत होणारी गर्दी लक्षात घेता ही सभा ऑनलाईन की, ऑफलाईन? कशा प्रकारे घ्यावी, यासाठी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांची परवानगी आवश्यक आहे. त्यानुसार ४ डिसेंबर रोजी पत्र पाठविले असून, गाईडलाईन यायची आहे. त्यानंतरच सिनेट सभेचे स्वरूप ठरेल.
- तुषार देशमुख, कुलसचिव, अमरावती विद्यापीठ.