शिंगणापूर फाट्याजवळ सात लाखाचा गांजा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:15 AM2021-09-14T04:15:45+5:302021-09-14T04:15:45+5:30

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, आंतरराज्यीय टोळीतील पाच जणांना अटक फोटो - नांदगाव खंडेश्वर १३ पी नांदगाव खंडेश्वर : अमरावती-यवतमाळ ...

Seven lakh cannabis seized near Shinganapur Fateh | शिंगणापूर फाट्याजवळ सात लाखाचा गांजा जप्त

शिंगणापूर फाट्याजवळ सात लाखाचा गांजा जप्त

Next

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, आंतरराज्यीय टोळीतील पाच जणांना अटक

फोटो - नांदगाव खंडेश्वर १३ पी

नांदगाव खंडेश्वर : अमरावती-यवतमाळ रोड वरील शिंगणापूर फाट्याजवळ सात लाख रुपयांचा गांजा जप्त करून पाच आरोपींना अटक करण्यात आली. अमरावती ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई ११ सप्टेंबर रोजी केली.

पोलीस सूत्रांनुसार, शकील शाह गुलू शाह (४९), अन्नु हुसैन ऊर्फ अन्वर हुसैन अहमद (३४, दोन्ही रा. चांदूर बाजार), शेख शकील शेख चांद (४९, रा. यास्मीननगर, अमरावती), विशाल किसन पाल (२६), मोहम्मद मोईन मोहम्मद हजरत (२१, दोघेही रा. दिल्ली) यांना अटक करण्यात आली आहे.

सण व उत्सवाची कालखंडात अवैध धंद्याला जबर बसविण्यासाठी पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार अमरावती येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तपन कोल्हे यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक गोपाल उपाध्याय व त्यांचे पथक अवैध धंद्यांवर कारवाई करण्याच्या उद्देशाने पेट्रोलिंगवर असताना त्यांना हे पाच जण शिंगणापूर फाट्यावर आढळले. गोपनीय माहितीवरून त्यांच्या पाठीवरील बॅगेची तपासणी केली असता, त्यामध्ये एकंदर ७० किलो ३७५ ग्रॅम वजनाचा ७ लाख ५ हजार ६७० रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला. त्याआधारे नांदगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत ठाकरे, सहायक पोलीस निरीक्षक गोपाल उपाध्याय व त्यांच्या पथकाने या पाच जणांना ताब्यात घेतले.

पोलीस अधीक्षक हरी बालाजी, अप्पर पोलीस अधीक्षक श्याम घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तपन कोल्हे यांच्या नेतृत्वात झालेल्या कारवाईत त्र्यंबक मनोहर, सुनील महात्मे, अमोल देशमुख, सै. अजमद, अमोल केंद्रे, नीलेश डांगोरे, सौरभ धरमठोक, दिनेश कनोजिया, रोशन चव्हाण, अमोल ढोके, सायबर सेलचे सागर धापड यांनी सहभाग घेतला.

130921\img-20210913-wa0003.jpg

सात लाखाचा गांजा जप्त. पाच आरोपींना अटक.

Web Title: Seven lakh cannabis seized near Shinganapur Fateh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.