शिवसैनिकांनी केली मतदाराला मारहाण
By admin | Published: October 15, 2014 11:14 PM2014-10-15T23:14:13+5:302014-10-15T23:14:13+5:30
विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला मतदान न करणाऱ्या एका मतदाराला शिवसैनिकांनी बदडून काढले. बुधवारी सायंकाळी ४.३० वाजता दरम्यान भातकुली येथील जिल्हा परिषद कन्या
भातकुली परिसरातील घटना : युवा स्वाभिमानीचे काम केल्याने घडला प्रकार
अमरावती : विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला मतदान न करणाऱ्या एका मतदाराला शिवसैनिकांनी बदडून काढले. बुधवारी सायंकाळी ४.३० वाजता दरम्यान भातकुली येथील जिल्हा परिषद कन्या हायस्कूलजवळ ही घटना घडली. बंडू हिम्मत चोरपगार, असे जखमी युवकाचे नाव आहे.
भातकुली परिसरातील रहिवासी बंडू चोरपगार हा युवक सायंकाळी ४ वाजता दरम्यान मतदान करण्याकरिता जिल्हा परिषद कन्या हायस्कूलमध्ये गेला होता. मतदान करुन तो बाहेर येताच त्याला नागमोते कुटुबांतील काही सदस्यांनी अडविले. यावेळी नागमोते कुटुंबातील काही सदस्यांनी त्याला मतदान केल्याबद्दल माहिती विचारली. यावेळी नागमोते कुटुबांतील सदस्य व बंडू यांच्यामध्ये वाद झाला. यावेळी शिवसैनिकांनी सांगितल्यावरही शिवसेना उमेदवाराला मतदान का केले नाही असे म्हणत जातीवाचक शिवीगाळ करुन त्या युवकाला मारहाण केली. यावेळी पोलिसांनी मध्यस्ती करुन त्यांचा वाद मिटविला व जखमी बंडू चोरपगार याला तत्काळ भातकुली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.