'ऑनलाईन'ला अल्प प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 05:00 AM2020-08-13T05:00:00+5:302020-08-13T05:01:49+5:30
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र कार्यालयात नागरिकांची गर्दी होऊ नये, यासाठी ऑनलाईन कास्ट व्हॅलिडिटी प्रक्रिया सुरु करण्यात आली. यात उमेदवारांना वंशावळ, रक्त संबंधाचे नाते सिद्ध करणारे पुरावे लागणार आहे. शाळा, महाविद्यालयाचे आवश्यक कागदपत्रे स्कॅ निंग करुन ते ऑनलाईन अपलोड करावे लागेल. त्यानंतर उमेदवारांनी अपलोड केलेली कादगपत्रांची समितीपुढे छानणी होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने १ ऑगस्टपासून प्रारंभ केलेल्या ऑनलाईन कास्ट व्हॅलिडिटीला अल्प प्रतिसाद मिळत आहे. गत १० दिवसात १५ प्रकरणे ऑनलाईन सादर करण्यात आलीत. मात्र, परिपूर्ण कागदपत्रे अभावी ही प्रकरणे रिजेक्ट करण्यात आली आहे. जात वैधता पडताळणी प्रमाणपत्रासाठी मानीव दिनांकाच्या पूर्वीचे कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे. त्यानंतर ई-मेलवर कास्ट व्हॅलिडिटी मिळेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र कार्यालयात नागरिकांची गर्दी होऊ नये, यासाठी ऑनलाईन कास्ट व्हॅलिडिटी प्रक्रिया सुरु करण्यात आली. यात उमेदवारांना वंशावळ, रक्त संबंधाचे नाते सिद्ध करणारे पुरावे लागणार आहे. शाळा, महाविद्यालयाचे आवश्यक कागदपत्रे स्कॅ निंग करुन ते ऑनलाईन अपलोड करावे लागेल. त्यानंतर उमेदवारांनी अपलोड केलेली कादगपत्रांची समितीपुढे छानणी होते. समितीने प्रकरण मंजूर केल्यानंतर उमेदवारांना ई-मेलवर ऑनलाईन कास्ट व्हॅलिडिटी मिळणार आहे.
मात्र, आतापर्यंत येथील जात वैधता समितीपुढे १५ प्रकरणे आले असले तरी यात एकाही उमेदवारांनी परिपूर्ण कागदपत्रे सादर केली नाहीत, असे समितीचे उपायुक्त सुनील वारे यांनी सांगितले. काही दिवस शुल्क सुद्धा कार्यालयात येऊन भरावे लागणार आहे.
असे लागेल पुरावे
अनुसूचित जाती - १९५० पूर्वीचे वंशावळ
इतर मागास वर्गीय - १९६७ पूर्वीचे वंशावळ
विमुक्त जाती, भटक्या जमाती- १९६१ पूर्वीचे वंशावळ