शुभंकरोती, रामरक्षा, नमाज, बायबलचे पठण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:15 AM2021-09-22T04:15:05+5:302021-09-22T04:15:05+5:30
अमरावती : कोरोना संसर्गामुळे गत दोन वर्षापासून शाळा बंद आहेत. विद्यार्थ्यांना केवळ ऑनलाईन अभ्यासक्रम शिकविला जात असला तरी ताे ...
अमरावती : कोरोना संसर्गामुळे गत दोन वर्षापासून शाळा बंद आहेत. विद्यार्थ्यांना केवळ ऑनलाईन अभ्यासक्रम शिकविला जात असला तरी ताे पचनी पडायला तयार नाही. फावल्या वेळेत लहान मुलांवर धार्मिक संस्कार करण्याकडे पालकांचा कल वाढत आहे. हिंदू बांधव शुभंकरोती, रामरक्षा, मुस्लिम बांधव कुराण, नमाज यासह ख्रिश्चन समाजात बायबल पठणाचे प्रणाम वाढले आहे.
मार्च २०२० पासून इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत विद्यार्थी घरातच आहेत. शहरात लहान मुलांना खेळण्यासाठी मैदाने नाहीत. घरात विद्यार्थी कंटाळले आहेत. पालकांकडे विविध मागण्यांचा तगादा लावत आहेत. पालकही मुलांना गुंतवून ठेवण्यासाठी धार्मिक संस्कार रुजविण्यावर भर देत आहेत.
-----------------
प्रत्येक समाजात संस्काराचे धडे
हिंदू सकाळी ८ ते दुपारी १ वाजेपर्यंत शाळेचा ऑनलाईन क्लास झाल्यानंतर दुपारी, सायंकाळी विद्यार्थ्यांना शुभंकरोतीचे पाठ म्हणायला लावणे. त्यांच्याकडून ते पाठ करून घेण्यावर पालक अधिक भर देत आहेत. या शिवाय गणपती स्तोत्र, मनाचे श्लोक आदी लहान मुलांकडून पाठ करून घेतले जात आहेत.
मुस्लिम
लहान मुलांना नमाज पठण कशापद्धतीने केले जाते. पवित्र धर्मग्रंथातील ‘सुरे’, अतहयात, कलमे पाठ करून घेतली जात आहेत. या शिवाय जेवणापूर्वी दुआ, झोपतानाची दुआ आदी छोट्य- छोट्या धार्मिक बाबी शिकविण्यात येत आहेत. लहान मुलेही अंत्यत आनंदाने हळूहळू या गोष्टी शिकत आहेत.
ख्रिश्चन
शालेल अभ्यासक्रमाशिवाय लहान मुलांवर धार्मिक संस्कार व्हावेत म्हणून लहान मुलांना बायबल वाचण्याची सवय लावण्यात येत आहे. त्यातील मतीतार्थही लहान मुलांना समजावून सांगण्यात येताे. धर्मगुरूंनी कशापद्धतीने त्याग केला, याची शिकवण लहान मुलांना देण्यात येते.
--------------
पुजारी म्हणतात...
‘रामरक्षा, गणपती स्तोत्र विष्णुसहस्त्रनाम अशी छोटी स्तोत्रे बालउपासनेच्या माध्यमातून शिकविण्यात येत आहे. अनेक पालकच मुलांना शिकविणतात. मोबाईलपासून त्यांना दूर ठेवण्याच्या हा एक चांगला पर्याय आहे. अनेक पुरोहितही घरी जाऊन लहान मुलांना अशा पद्धतीने शिकवण देत आहेत.
- रामहरी सत्रे
--------------
काझी म्हणतात...
मुस्लिम बांधव लहान मुलांना धार्मिक शिकवण देण्यासाठी वेगळी व्यवस्था करतात. मशिद, मदरशामध्ये मोफत शिक्षण दिले जाते. कोरोना संसर्गामुळे अनेक पालकांनी घरीच मुलांना धार्मिक शिक्षण देण्यावर भर देतात. त्यासाठी खास शिक्षण देणारे मौलाना नेमण्यात आले आहेत.
- मोहम्मद रफीक
---------------
ब्रदर म्हणतात...
लहान मुले शाळेत जाऊ शकत नाहीत. त्यामुळे धार्मिक संस्कार रूजविण्यावर पालक भर देत आहेत. घरातील मोठ्यांचे अनुकरण लहान मुुले लवकर करतात. त्यानुसार अनुशासन तयार होते. नियमित बायबल वाचनामुळे लहान मुलांमध्ये संस्कार रूजृू लागतात. त्यांची वाढ नैतिकतेत आणि धार्मिकतेत होते.
- पास्टर विनाेद इंगळे