इलेक्ट्रॉनिक्स अभियंत्यांचा सल्ला ठरणार महत्त्वाचा पुरावा

By admin | Published: February 28, 2016 12:32 AM2016-02-28T00:32:18+5:302016-02-28T00:32:18+5:30

निकिता सवई मृत्यू प्रकरणातील शवविच्छेदन अहवालानंतर निकिताचा मृत्यू विद्युत प्रवाहाच्या स्पर्शाने झाल्याचे शवविच्छेदनावरून स्पष्ट झाले.

Significant evidence for electronics engineers' advice | इलेक्ट्रॉनिक्स अभियंत्यांचा सल्ला ठरणार महत्त्वाचा पुरावा

इलेक्ट्रॉनिक्स अभियंत्यांचा सल्ला ठरणार महत्त्वाचा पुरावा

Next

पोलीस आयुक्तांची घटनास्थळाला भेट : विद्युत प्रवाहाच्या झटक्याने निकिताचा मृत्यू
अमरावती : निकिता सवई मृत्यू प्रकरणातील शवविच्छेदन अहवालानंतर निकिताचा मृत्यू विद्युत प्रवाहाच्या स्पर्शाने झाल्याचे शवविच्छेदनावरून स्पष्ट झाले. मात्र, विद्युत प्रवाहाचा झटका तिच्याच चुकीमुळे लागला की, तिची हत्या करण्याच्या उद्देशाने देण्यात आला, याबाबत पोलिसांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे पोलीस विभागाने शासकीय इलेक्ट्रॉनिक्स अभियंत्याचा सल्ला घेतला असून तो महत्त्वाचा पुरावा ठरू शकेल, अशी माहिती शनिवारी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर 'लोकमत'शी संवाद साधताना दिली. याप्रकरणाचे तपासकार्य लवकर पूर्ण करा, असे निर्देश त्यांनी राजापेठचे पोलीस निरीक्षक एस.एस. भगत यांना दिले.
फरशी स्टॉप परिसरातील रहिवासी मधुकर ढोले यांच्या घरात भाड्याने राहणाऱ्या निकिता सवईचा मृतदेह संशयास्पद स्थितीत तिच्या खोलीत आढळून आला.

मोबाईल कॉलची
घेतली जातेय माहिती
अमरावती : तिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर तिचा मृत्यू विद्युत प्रवाहाच्या झटक्याने झाल्याचे स्पष्ट झाले. मात्र, तिला विद्युत प्रवाहाचा झटका लागला कसा, हा प्रश्न पोलीस तपासात अडसर निर्माण करणारा ठरला आहे. शनिवारी पोलीस आयुक्त दत्तात्रेय मंडलिक यांनी घटनास्थळी भेट देऊन निकिताच्या खोलीची पाहणी केली.
यावेळी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पाटील व राजापेठचे ठाणेदार एस.एस.भगत उपस्थित होते. घटनास्थळाची पाहणी करून त्यांनी ठाणेदाराना योग्य ते निर्देश दिले. निकीताच्या मृत्यूपूर्वी तिला भेटण्याकरिता आलेल्या काही व्यक्तींचे पोलिसांनी बयाण नोंदविले आहेत. तसेच तिच्या मोबाईल कॉलच्या माहितीवरून तिच्याशी संपर्क करणाऱ्यांची बयाणे सुध्दा पोलिसांनी नोंदविली आहे.
आतापर्यंत पोलिसांनी २० जणांचे बयाण नोंदविले असून अद्यापर्यंत घटनेचे गुढ कायमच आहे. शुक्रवारी राजापेठ पोलिसांनी एका युवकाला चौकशीकरिता ताब्यात घेतले होते. त्याची चौकशीसुध्दा सुरू आहे. निकिताला विद्युत प्रवाहाचा झटका कसा बसला? याबाबत माहिती जाणून घेण्याकरिता पोलिसांनी इलेक्ट्रानिक्स अभियंताचा सल्ला घेतला आहे.
तसेच परिस्थितीजन्य पुरावे आणि निकिताला भेटणारे व संवाद साधणाऱ्यांच्या चौकशीतून या प्रकरणाचा उलगडा होण्याची शक्यता पोलीस आयुक्त मंडलिक यांनी वर्तविली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Significant evidence for electronics engineers' advice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.