सीताफळाचे भाव कडाडले, विक्रेते ग्राहक अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2019 01:50 AM2019-10-27T01:50:11+5:302019-10-27T01:51:36+5:30
अचलपूर मतदारसंघातील अचलपूर आणि चांदूरबाजार तालुक्यात सातपुड्याच्या पायथ्याशी जंगल माळरानावर व चंद्रभागा, पूर्णा, शहानूर, सपन न बिच्छन नदीकाठावरील आणि नदीकाठच्या परिसरातील गावराण सीताफळाचा गोडवा काही औरच आहे. या सीताफळांना परराज्यासह स्वराज्यात अधिक मागणी आहे. उल्लेखनीय अशी नैसर्गिकरीत्या बनलेली सीताफळाची अनेक बने आहेत. या सीताफळांना स्वतंत्र ओळख आहे.
अनिल कडू।
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : सततच्या पावसामुळे सीताफळांच्या बनातील फळांना पाहिजे तसा उत्तम दर्जाचा आकार आलाच नाही.त्यामुळे सीताफळाचे भाव चांगलेच कडाडले आहे. यात विक्रेत्यांसह ग्राहकही अडचणीत आले आहेत.
अचलपूर मतदारसंघातील अचलपूर आणि चांदूरबाजार तालुक्यात सातपुड्याच्या पायथ्याशी जंगल माळरानावर व चंद्रभागा, पूर्णा, शहानूर, सपन न बिच्छन नदीकाठावरील आणि नदीकाठच्या परिसरातील गावराण सीताफळाचा गोडवा काही औरच आहे. या सीताफळांना परराज्यासह स्वराज्यात अधिक मागणी आहे. उल्लेखनीय अशी नैसर्गिकरीत्या बनलेली सीताफळाची अनेक बने आहेत. या सीताफळांना स्वतंत्र ओळख आहे. यातून गरीब आदिवासींसह भूमिहीम शेतमजुरांना रोजगार उपलब्ध झाला आहे. सीताफळाचे व्यापारी ही नैसर्गिक सीताफळाची बनं, परिसर हर्रासात संबंधित विभागाकडून विकत घेतात. त्याची मालकी मिळवितात. यानंतर या सीताफळ बनांची राखन करून वेळोवेळी त्यातील फळांची तोड करतात. तोडलेल्या फळांची छाटणी करून ग्रेडींग करून फळांच्या डब्यात पॅक करतात. ही उत्तम दर्जाची, एक नंबरची फळ मोठमोठ्या शहरात विक्रीकरिता पाठवतात. सोबतच कॅरेटमध्ये भरूनही फळ बाजार विक्रीकरिता पाठविली जातात. परतवाडा-बैतूल रोडवरील बहिरम, काशी तलाव व फॉरेस्ट आणि जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जागेतील सिताफळांच्या बनांचा, झाडांचा हर्रास यावर्षी व्यापाऱ्यांनी केवळ सव्वाचार लाखालाच घेतला. पावसामुळे या बनात मालच बनलेला नाही, असे त्या व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. खर्चासह बरोबरी होते की नाही याबाबत हे व्यापारी साशंक आहे. याच व्यापाºयांनी काही शेतकºयांचे सिताफळाचे बगीचेही विकत घेतले आहेत.
अति पाऊस
यावर्षी सुरूवातीला पाऊस लांबला; नंतर लागून पडलेला पाऊस ऑक्टोबरच्या शेवटापर्यंतही थांबायचे नाव घेत नाही. सततच्या पावसामुळे झाडांना सिताफळ लागलेत नाही. फळाअभावी वृक्ष विरळ झाले आहेत. यात भाव कडाडले असून शंभर ते एकशे वीस रूपये किलो दराने सिताफळ विकल्या जात आहेत. एका किलोत केवळ चार ते पाच फळ बसत आहेत. तर आदिवासींसह गोरगरीब शेतमजुरांकडून बाजारात विकायला आणल्या जाणाऱ्या सिताफळांच्या टोपल्यांची संख्याही रोडावली आहे.
संशोधन केंद्रांची गरज
सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी डोंगर माळराणावर व नदीकाठी गावरान सीताफळे मधाळ आहेत. शेतकरीही सीताफळ लागवडीकडे वळला आहे. यात प्रक्रिया उद्योग, संशोधन केंद्र झाल्यास रोजगाराची दुहेरी संधी उपलब्ध होऊ शकेल.