ऑनलाईन गेमचा नाद, त्याने घातली यमाला ‘साद’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:10 AM2021-07-21T04:10:50+5:302021-07-21T04:10:50+5:30

सागर हा बँकेत काम करीत असून तो ऑनलाइन गेम मध्ये पैसे हारला असल्याचे समजते. पैसे हरल्यामुळे तो नेहमीच विवंचनेत ...

The sound of an online game, he called Yama 'Saad'! | ऑनलाईन गेमचा नाद, त्याने घातली यमाला ‘साद’!

ऑनलाईन गेमचा नाद, त्याने घातली यमाला ‘साद’!

Next

सागर हा बँकेत काम करीत असून तो ऑनलाइन गेम मध्ये पैसे हारला असल्याचे समजते. पैसे हरल्यामुळे तो नेहमीच विवंचनेत राहत होता. १८ जुलै रोजी त्याने मोर्शी लगत असलेल्या माळू नदीच्या पात्रात रात्री ११ वाजताचे सुमारास उडी घेऊन त्याने आपली जीवनयात्रा संपविली. घटनेची माहिती पोलिसांना प्राप्त होताच त्यांनी महसूल विभागाला याबाबतची माहिती दिली. तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क केला.

१९ जुलै रोजी सागरचे नातेवाईक माळू नदीच्या पुलावर शोध घेण्यासाठी आले असता त्यांना सागरची दुचाकी गाडी व चपला आढळून आल्या. पोलीस पथक व जिल्हा बचाव पथकाच्या वतीने शोध मोहीम राबविण्यात आली. मात्र, सागरचा मृतदेह आढळून आला नाही. २० जुलै रोजी पुन्हा शोध कार्य सुरू करण्यात आल्यावर सागरचा मृतदेह माळू नदीच्या जुन्या पुलाच्या बाजूने वाहत्या पाण्याच्या दिशेने फुगलेल्या अवस्थेत आढळून आला. उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृतकावर शवविच्छेदन करून प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात दिले.

Web Title: The sound of an online game, he called Yama 'Saad'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.