सात लाख हेक्टरमध्ये पेरणी
By admin | Published: June 15, 2015 12:11 AM2015-06-15T00:11:09+5:302015-06-15T00:11:09+5:30
आठ तारखेपासून सुरु झालेल्या मृग नक्षत्रात शनिवारी मान्सूनने सार्वत्रिक हजेरी लावताच पेरणीपूर्व अंतिम मशागतीसाठी शेतकऱ्यांची लगबग वाढली आहे.
गजानन मोहोड अमरावती
आठ तारखेपासून सुरु झालेल्या मृग नक्षत्रात शनिवारी मान्सूनने सार्वत्रिक हजेरी लावताच पेरणीपूर्व अंतिम मशागतीसाठी शेतकऱ्यांची लगबग वाढली आहे. यंदाच्या खरिपाच्या हंगामात ७ लाख १४ हजार ९५० हेक्टर पेरणीक्षेत्राचे नियोजन आहे. पूर्वमान्सून व संरक्षित सिंचनाची सोय असणाऱ्या क्षेत्रात अद्याप एक टक्काही पेरणी झालेली नाही. जमिनीत आर्द्रता नसल्यामुळे किमान ६० ते ७० मि.मी. पाऊ स झाल्याशिवाय पेरणी करु नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार यंदाच्या खरीप हंगामात पावसाच्या सरासरीच्या तुलनेत एकूण ८८ मि.मी. पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला आहे.
ं-तर भासेल ओलाव्याचा अभाव
अमरावती : मान्सूनच्या पावसाची एक दोन दिवस मागेपुढे सुरुवात होईल. परंतु नंतर पावसात खंड पडण्याची शक्यता आहे. जुलैमध्ये पाऊस सरासरी पार करणार असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. खरीप २०१४ च्या हंगामात जून महिन्याची पावसाची एकूण सरासरी १४६ मिमी असताना केवळ ४० मि.मी. पावसाची नोंद झाली होती. ही टक्केवारी केवळ ३४ होती. परिणामी शेतकऱ्यांवर दुबार पेरणी व बियाणे उगवण न झाल्याचे संकट ओढवले होते. मात्र जुलै महिन्यात पावसाची एकूण सरासरी २७७ मि.मी.च्या तुलनेत ३८६ मि.मी. म्हणजेच १३९ टक्के पाऊस पडला होता. यंदा जूनमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्यास खरीप पिकांच्या योग्यवेळी पेरणीसाठी जमिनीत पुरेसा ओलाव्याचा अभाव राहण्याची शक्यता आहे. कडधान्य पिकाची वेळेवर पेरणी करण्यास अडचणी संभवतात, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.
यंदाच्या खरीप हंगामाच्या पहिल्याच पावसामुळे शेतकऱ्यांना सध्या दिलासा मिळाला आहे. पेरणीपूर्व अंतिम मशागतीसाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरु झाली आहे. वखर, फलटन, जांभूळवाहित, पट्टीपास आदी मिळेल त्या साधनाव्दारे तयारीला लागला आहे. बि-बियाणे खरेदीला वेग आला आहे. बीटी कपाशीची पाकीटावर १०० रुपये कमी करुन शासनाने शेतकऱ्याला अंशत: दिलासा दिला आहे. नैसर्गिक आपत्तीपासून पिकाचे संरक्षण व्हावे, यासाठी दोन पीक विमा योजना सुरु केल्या आहेत. बोगस बियाण्यांचया शिरकाव होऊ नये यासाठी १५ भरारी पथके तैनात आहेत.
कृषी विभागाच्या नियोजना नुसार यंदा सोयाबीनचे ३ लाख ४० हजार हेक्टर पेरणी क्षेत्र राहणार आहे. पाऊ स उशिरा आल्यास ६० दिवसांचे पीक असणारे मूग व उडीद पेरणीचे प्रमाण कमी होऊन सोयाबीन व कपाशीचे पेरणीक्षेत्र वाढण्याची शक्यता आहे.