शुक्रवारी सकाळी ९:३० वाजता स्व. बाळासाहेब ठाकरे चौकात पीएसआय गणेश मुपडे यांच्याहस्ते हारार्पण व पूजन करून फवारणीला सुरूवात करण्यात आली. यावेळी शिवसेना शहर प्रमुख स्वप्निल मानकर, किशोर यादव, गजानन यादव, प्रणव बोके, गिरीश पोलाड, राजू शिवणकर, रोशन खंडार, स्वराज केने, पंकज रामटेके, अनूज पोलाड, अमित क्षिरसागर, अर्पित देशमुख, मयूर धर्माळे, शुभम देशमुख, सूरज चौधरी उपस्थित होते. यावेळी मेन मार्केट लाईन, गाडगेबाबा मार्केट, टांगा गल्ली, शिक्षक कॉलनी, राम नगर, साईनाथ कॉलनी, जालान लेआऊट येथे सकाळी पहिल्या टप्प्यात फवारणी करण्यात आली. दुसरा टप्प्यात शहरातील इंदिरा नगर, ढोले कॉलनी, गुलमोहर कॉलनी, विरुळ रोड, राजीव गांधी नगर, राधा नगर, को. ऑप. बँक कॉलनी, मेहरबाबा नगर मंगलमूर्ती नगर येथे निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे.
चांदूर रेल्वे शहरात निर्जंतुकीकरण अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 4:13 AM