पोट भरण्याची मारामार; मी कशाला टॅक्स भरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:14 AM2021-09-22T04:14:52+5:302021-09-22T04:14:52+5:30
अमरावती : कुठलाही व्यवसाय घ्या, प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे शासनाच्या अनेक करांचा भरणा नागरिकांना करावा लागतो. अनेकदा याची जाणीवदेखील कित्येकांना नसते. ...
अमरावती : कुठलाही व्यवसाय घ्या, प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे शासनाच्या अनेक करांचा भरणा नागरिकांना करावा लागतो. अनेकदा याची जाणीवदेखील कित्येकांना नसते. कोरोनाकाळासह अनेक कारणांमुळे जेथे पोट भरण्याची मारामार आहे. अशा परिस्थितीत या करांचा भरणा कसा करावा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जिल्ह्यात दीड वर्षापासून कोरोनाचे संकट असल्यामुळे लहान-मोठ्या व्यवसायाचे तीनतेरा वाजले आहेत. लॉकडाऊन, कठोर संचारबंदीमुळे लहान-मोठे उद्योग व्यवसाय, डबघाईस आलेले आहे. थोडी शिथिलता मिळतात गाडी रुळावर येईल असे वाटत असतानाच पुन्हा निर्बंध लागतात. त्यामुळे प्रत्येकच व्यवसायाचे कमी-अधिक प्रमाणात नुकसान झालेले आहे. यामधून सर्वजण अद्यापही सावरलेले नाहीत.
कोरोना दृष्टचक्रात व्यवसाय माघारले आहे. दिवसभरात किती व्यवसाय होईल याची चिंता भेडसावत असताना विविध करांचे भूत मानगुटीवर बसलेलेच आहे. त्यामुळे व्यावसायिक आज त्रस्त आहेत. कराची आकारणी आहे, तेवढेही उत्पन्न होणार की नाही, याची शास्वती नसल्याने आपण कराचा भरणाच करणार नसल्याची भावना त्यांनी बोलून दाखविली आहे.
बॉक्स
आपणही भरता का टॅक्स?
* कामगार- खासगी कंपनीत कामाला आहे. येथे सुटी घेतल्यास पगार कापला जातो, पगारात उदरनिर्वाह होत नाही, त्यामुळे तो करपात्र नाही.
* ऑटोचालक : कोरोनाकाळात व्यवसाय होत नाही, पेट्रोलचे भाव ११० रुपयांवर आहे. त्यामुळे कुठला कर, कोणताही कराचा भरणा करणार नाही.
* भाजीपाला विक्रेता : पहिल्यासारखे व्यवसाय आता होत नाही, भावदेखील वाढले आहेत. हा व्यवसाय करपात्र नाही असे आतापर्यंतचा अनुभव आहे.
* फेरीवाला : गल्लोगल्ली फिरावे लागते. कुठला कर अन् कशाचा कर आपल्याला काहीही माहिती नाही, असल्यासच भरणा करणार नाही.
* सिक्युरिटी गार्ड : आमचा पगारच करपात्र नाही. तुटपुंजे वेतन असल्याने कुठलाच कर भरण्याचा प्रश्न उद्भवत नाही. यामध्ये उदरनिर्वाहच होत नाही.
* सफाई कामगार : आजपर्यंत कोणत्याही कराचा भरणा केला नाही, घर टॅक्सशिवाय अन्य कोणताही कर आपल्याला माहीत नाही.
* सलून चालक : कोरोनाकाळात व्यवसायाचे मोठे नुकसान झालेले आहे. आमचा व्यवसाय करपात्र नाही, कुठलाही कर भरणार नाही.
* लॉन्ड्रीचालक : कोरोनाकाळात व्यवसाय मंदावला, दुकाचे भाडेदेखील निघत नाही. तेथे कोणत्या कराची गोष्ट करता भाऊ,
* घरकाम करणाऱ्या महिला : कोरोनाकाळात अनेक घरांचे काम हातचे गेले. कोणता कर आणि कशाचा कर, काही प्रश्नच येत नाही.
कोट
कोरोनाकाळात प्रत्येक घटकांच्या उत्पन्नात कमी आलेली आहे. व्यवहारात प्रत्यक्ष कराचा भरणा केला जातो. मात्र, अप्रत्यक्ष करदेखील आपल्याद्वारा भरले जातात याची कल्पना अनेकांना नाही. पेट्रोल असो किंवा जीएसटी उपभोक्त्यांनाच द्यावा लागत आहे.
डॉ. धनंजय पाटील
अर्थ सल्लागार