प्रकल्पग्रस्तांचा रहाटगाव टी-पॉर्इंटवर रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 11:06 PM2019-06-27T23:06:49+5:302019-06-27T23:07:12+5:30

जिल्हा व तालुकास्तरावर प्रकल्पग्रस्तांनी विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी गुरुवारी चक्काजाम आंदोलनाच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तो उधळून लावला. विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त कृती संघर्ष समितीने पोलिसांच्या कृतीचा निषेध नोंदविला.

Stop the road to the project-affected Rahtgaon T-Point | प्रकल्पग्रस्तांचा रहाटगाव टी-पॉर्इंटवर रास्ता रोको

प्रकल्पग्रस्तांचा रहाटगाव टी-पॉर्इंटवर रास्ता रोको

Next
ठळक मुद्दे२२ जणांना अटक : पोलीस कारवाईचा निषेध

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्हा व तालुकास्तरावर प्रकल्पग्रस्तांनी विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी गुरुवारी चक्काजाम आंदोलनाच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तो उधळून लावला. विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त कृती संघर्ष समितीने पोलिसांच्या कृतीचा निषेध नोंदविला.
शासनाने २६ जून २००६ रोजी परिपत्रक काढून शेतकऱ्यांच्या जमिनी सरळ वाटाघाटीने संपादित केल्याचे कागदोपत्री दर्शवून भूसंपादन कायदा कलम ४ ची भीती घालून दहशत निर्माण केली. सन २००६ पासून निर्माण झालेल्या व प्रक्रियेत असलेल्या प्रकल्पांसाठी शासनाने शेतकऱ्यांच्या अशाप्रकारे अल्प दरात जमिनी अधिग्रहीत केल्या. सदर प्रकल्प अद्यापही पूर्ण झालेले नाहीत. प्रत्येक शेतकºयाला वेगवेगळ्या दराने मोबदला देण्यात आला. तो सन २०१३ च्या जीआरनुसार ठरवून फरकाची रक्कम संबंधित शेतकºयांना द्यावी. प्रकल्पग्रस्त कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी द्यावी. अल्प मोबदल्यामुळे घर न झाल्याने अनेकांनी आत्महत्येचा मार्ग पत्करल्याचे दिसून येत आहे. या मुद्द्यांवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त कृती संघर्ष समितीचे अध्यक्ष मनोज चव्हाण यांच्या नेतृत्वात रहाटगावजवळील टी-पॉर्इंटवर गुरुवारी सकाळी १०.३० वाजता चक्काजाम आंदोलनासाठी आंदोलक पोहोचले. त्यांनी वाहतूक रोखून धरली होती. मात्र, गाडगेनगरचे ठाणेदार मनीष ठाकरे यांच्या मार्गदर्शनात पोलिसांचा ताफा आंदोलनस्थळी पोहोचला आणि समितीचे अध्यक्ष मनोज चव्हाण यांच्यासह २९ जणांना ताब्यात घेण्यात आले. यामध्ये पंडित बिसेवार, अमोल ठाकूर, अमित चव्हाण, अंकुश चवरे, राहुल पाटघरे, विजय मोहोड, प्रल्हाद गुजर गजानन गिरनार, रावसाहेब भटकर, राहुल पेठेकर, महादेवसिंह चव्हाण, अशोक मोहोड, पांडुरंग मुंडे, शुभम पाटील, अजय मोहोड, उमेश कुरवाडे, भोजराज वानखडे, दीपक शिंगाडे, सुधाकर पाचोड, अशोक गजभिये, रवि बद्रिया, वासुदेव इंगळे, शालिग्राम कडू, राजकुमार कडू, गोवर्धन थोरात व अन्य तीन महिलांचा समावेश आहे. उपनिरीक्षक एम.जी. सामटकर यांच्या फिर्यादीवरून त्यांच्याविरुद्ध भादंविचे कलम ३४१ व मपोका १३५ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले. स्थानबद्ध करून गाडगेनगर पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्यांना सोडण्यात आले.
न्यायालयात बेमुदत उपोषण करणार
विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त कृती संघर्ष समितीचे अध्यक्ष मनोज चव्हाण यांची गुरुवारी दुपारी २ वाजता पत्रपरिषद होती. मात्र, आंदोलनस्थळाहून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्याने पत्रपरिषद होऊ शकली नाही. त्यांनी जामीन न घेता कारागृहात जाण्याची तयारी दर्शविली असून, तेथे बेमुदत उपोषण करणार असल्याचे भ्रमणध्वनीद्वारे पत्रकारांना सांगितले.

Web Title: Stop the road to the project-affected Rahtgaon T-Point

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.