जिल्ह्यात गटविकास अधिकाऱ्यांचे काम बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 10:07 PM2018-02-26T22:07:25+5:302018-02-26T22:07:25+5:30

परंडा (जि. उस्मानाबाद) पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्याला एका संघटनेच्या पदाधिकाऱ्याने मारहाणीच्या निषेधार्थ सोमवार, २६ फेब्रुवारीपासून जिल्ह्यातील १४ पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे.

Stop the work of group development officials in the district | जिल्ह्यात गटविकास अधिकाऱ्यांचे काम बंद

जिल्ह्यात गटविकास अधिकाऱ्यांचे काम बंद

Next
ठळक मुद्देआंदोलन : परंडा येथील बीडीओला मारहाण प्रकरणाचा निषेध

आॅनलाईन लोकमत
अमरावती : परंडा (जि. उस्मानाबाद) पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्याला एका संघटनेच्या पदाधिकाऱ्याने मारहाणीच्या निषेधार्थ सोमवार, २६ फेब्रुवारीपासून जिल्ह्यातील १४ पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे.
बीडीओंना मारहाणीच्या घटना कमी होण्याऐवजी हे प्रकार वाढत चालले असल्याने या घटनांचा निषेध व्यक्त करीत यासंदर्भात महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित अधिकारी संघटनेच्या जिल्हा शाखेने विभागीय आयुक्त पीयूष सिंह व मुख्य कार्यकारी अधिकारी के.एम. अहमद यांना निवेदन दिले. महाराष्ट्र विकास सेवातील अधिकाºयांना शिवीगाळ करणे, धक्काबुकी करणे, मारहाण करण्याचे प्रकार वाढले आहेत. ३० जानेवारी रोजी उदगीरच्या बीडीओंना शिवीगाळ व धक्काबुक्की करण्यात आली. परंडाच्या बीडीओंंना २२ फेब्रुवारीला रस्त्यावर बेदम मारहाण करण्यात आली.
काम बंदने कामकाज प्रभावित
शासनाने अद्याप कुठलीही कारवाई केली नाही. बीडीओंसह इतर मारहाणीच्या घटनांनी महाराष्ट्र विकास सेवेतील अधिकाऱ्यांचे मनोधैर्य खच्चीकरण झाले असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. परिणामी राज्यातील अधिकाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजना हिरीरीने राबविताना राजरोस होणारे हल्ले अत्यंत घृणास्पद व निंदाजनक असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे अमरावतीसह संपूर्ण राज्यभरात बीडीओंनी २६ फेब्रुवारीपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. प्रकल्प संचालक के.एम. अहमद, अतिरिक्त सीईओ विनय ठमके, डेप्युटी सीईओ संजय इंगळे, माया वानखडे, महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित अधिकारी संघटनेने जिल्हाध्यक्ष अरविंद गुडधे, बीडीओ बाळासाहेब अकलाडे, सागर पाटील, विनोद मेंढे, बाळासाहेब रायबोले, भास्कर रेंगळे, उमेश देशमुख, थोरात आंदोलनात सहभागी झाले.
काय आहे मागणी?
३३६ पंचायत समितीस्तरावर बीडीओ, सहायक बीडीओ यांना तसेच सर्व ३४ जिल्हा परिषद मुख्यालयांमध्ये संरक्षणाच्या दृष्टीने शस्त्रधारी पोलीस देण्यात यावा.

राज्यात गटविकास अधिकाºयांना मारहाणीच्या घटना वाढत आहेत. परिणामी अधिकाºयांचे मनोधैर्य खच्ची होत आहे. या प्रकारांना आळा घालणे आवश्यक आहे. त्यासाठीच आम्ही काम बंद आंदोलन पुकारले आहे.
- अरविंद गुडधे
जिल्हाध्यक्ष, म.रा. राजपत्रित अधिकारी संघटना

Web Title: Stop the work of group development officials in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.