अमरावती : संत गाडगे बाबा अमरावतीविद्यापीठाच्यावतीने प्रो. राम मेघे टेक्नॉलॉजी अॅन्ड रिसर्ज, बडनेरा येथे चार दिवस पार पडलेल्या युवा महोत्सवात विद्यार्थी कलावंतांनी विविध कलेचे रंग उधळीत युवा महोत्सव २०२३ रंगारंग केला. चवथ्या व अखेरच्या दिवशी विद्यार्थ्यांनी लोकनृत्य, स्किट व माईम, एकांकिका, मिमिक्री, सुगम संगीत, शास्त्रीय वाद्य संगीत (ताल वाद्य), शास्त्रीय वाद्य संगीत (स्वर वाद्य) मेहंदी, रांगोळी असे कलाप्रकार सादर करुन उपस्थितांची वाहवा मिळविली.
पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांनी लोकनृत्य,भारतीय समूहगान, एकांकिका, स्किट व माईम, वादविवाद स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, कोलाज, स्थळ छायाचित्रीकरण, पाश्चिमात्य वाद्यसंगीत/ पाश्चिमात्य एकल गायन व पाश्चिमात्य समूहगान, क्विज लेखी परीक्षा, दुस-या दिवशी शास्त्रीय संगीत, लोकनृत्य, भारतीय समूहगान, सुगम संगीत, एकांकिका, स्किट व माईम, वादविवाद स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, स्पॉट पेंटिंग, पोस्टर मेकिंग, तिस-या दिवशी लोकनृत्य, भारतीय समूहगान, सुगम संगीत, एकांकिका, स्किट व माईम, वादविवाद स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, कार्टुनिंग, क्ले-मॉडलिंग, शास्त्रीय गायन असे कलाप्रकार सादर करुन उपस्थितांची दाद मिळविली. आपल्या कलेचे रंग उधळीत युवा महोत्सवात रंग भरणाऱ्या विद्यार्थी कलावंतांवर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव करण्यात आला.
विद्यार्थ्यांचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगांवकर, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, प्राचार्य डॉ. गजेंद्र बमनोटे यांनी कौतुक केले आहे. युवा महोत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी महाविद्यालयाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा. विजय काळे, युवा महोत्सव समन्वयक प्रा. राज देशमुख, डॉ. निक्कू खालसा यांचेसह महाविद्यालयातील शिक्षकगण अथक परिश्रम घेतले.