शिवारात बहरले उन्हाळी तिळाचे पीक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:12 AM2021-05-10T04:12:28+5:302021-05-10T04:12:28+5:30
नांदगाव खंडेश्वर : यावर्षी पाऊस चांगला झाल्याने शेतातील विहिरीच्या पाण्याची पातळी वाढली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी उन्हाळी भुईमूग व तिळाची ...
नांदगाव खंडेश्वर : यावर्षी पाऊस चांगला झाल्याने शेतातील विहिरीच्या पाण्याची पातळी वाढली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी उन्हाळी भुईमूग व तिळाची पेरणी केली. भर उन्हाळ्यात तिळाचे पीक आता बहरले आहे.
सध्या भुईमुगाच्या पिकाला शेंगा असून उन्हाळी तिळाला फुले व बोंडी तयार झाल्या आहेत. पहूर शिवारात व तालुक्यात काही ठिकाणी उन्हाळी तिळाचा पेरा आढळून आला. शेतकऱ्यांनी या हंगामात सोयाबीन व तुरीची पेरणी केली होती. त्याच क्षेत्रात ही पिके काढल्यानंतर उन्हाळी तिळाची पेरणी केली. एकाच क्षेत्रात एका वर्षात अशाप्रकारे तीन पिके घेण्याचा प्रयोग बऱ्याच शेतकऱ्यांनी केला आहे. चार एकर क्षेत्रात उन्हाळी तिळाची पेरणी केली. पेरणीसाठी सुमारे साडेपाच किलो बियाणे लागले. एकरी तीन ते चार क्विंटलचे उत्पादन अपेक्षित असल्याची माहिती पहूर येथील शेतकरी पांडुरंग भेंडे यांनी दिली.