सत्यशोधनासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती टाकरखेड्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:30 AM2020-12-12T04:30:41+5:302020-12-12T04:30:41+5:30
आसेगाव पूर्णा : चांदूर बाजार तालुक्यातील टाकरखेडा पूर्णा येथील आपल्या टिन व कौलारू घरातील विविध कापड व प्लास्टिक साहित्याला ...
आसेगाव पूर्णा : चांदूर बाजार तालुक्यातील टाकरखेडा पूर्णा येथील आपल्या टिन व कौलारू घरातील विविध कापड व प्लास्टिक साहित्याला रहस्यमयरीत्या आग लागत असल्याचा दावा पातालबन्सी कुटुंबीयांनी केला होता. त्या दाव्याची पडताळणी व सत्य शोधण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती शनिवारी टाकरखेड्यात दाखल होणार आहे.
‘टाकरखेडा पूर्णा येथील घरात रहस्यमय आग’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने तो दावा लोकदरबारात मांडला. त्याची दखल घेत आपण आपल्या सहकाऱ्यांसह टाकरखेडा पूर्णा येथील पातालबंसी कुटुंबाला भेट देणार असल्याची माहिती अंधश्रद्धा निर्मूलन समिती, अमरावतीचे हरीश केदार यांनी ‘लोकमत’ ला दिली. विविध कापड व प्लास्टिक साहित्याला आग लागत असल्याचा दावा पातालबन्सी कुटुंबीयांनी केला होता. त्यामुळे परिसरात उलट सुलट चर्चेला पेव फुटले आहे. नागरिकांनी उलटसुलट तर्क काढत आहेत.