शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर राजकीय एन्काउंटर करु, आमच्या भानगडीत पडू नका”; मनोज जरांगेंचा अमित शाह यांना इशारा
2
मनोज जरांगे पाटील आता दसरा मेळावा घेणार? भव्य कार्यक्रम अन् शक्तिप्रदर्शन, तयारीला वेग!
3
नसरल्लाहच्या मृत्यूनंतर जागतिक दहशतवादी हाशिम सफीद्दीन बनला हिजबुल्लाचा प्रमुख
4
"जर निवडणूक जिंकलो तर...!"; डोनाल्ड ट्रम्प Google वर भडकले, दिला थेट इशारा
5
IPL 2025 : मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना खुशखबर; कोणता संघ कोणाला रिटेन करणार, वाचा
6
लेबनॉनचे लष्कर, सरकार गायब! लोक सिरियाकडे पलायन करू लागले, रात्र काढली रस्त्यावर बसून
7
भाजपा नेते हर्षवर्धन पाटलांना राष्ट्रवादीत घेणार का?; शरद पवारांचं मोठं विधान
8
जर CSK नं अनकॅप्ड प्लेयरच्या रुपात MS धोनीला रिटेन केलं तर किती असेल त्याचं पॅकेज?
9
Balasaheb Thorat : 'हर्षवर्धन पाटलांना चांगल्या संधी काँग्रेसमध्ये दिल्या, त्यांचा निर्णय चुकला'; बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितलं
10
SL vs NZ 2nd Test: चला पुन्हा एक दिवस सुट्टीचा! परफेक्ट ड्युटीसह लंकेनं चौथ्या दिवशीच किवींचा खेळ केला खल्लास
11
मविआत उद्धव ठाकरेंवर दबाव?; ठाकरे गटाच्या नेत्याचा काँग्रेसला गर्भित इशारा
12
जितेंद्र आव्हाडांकडून खळबळजनक ऑडिओ क्लिप पोस्ट; अक्षय शिंदेची हत्या झाल्याचा दावा
13
'त्या' खेळाडूंवर बंदी घालायलाच हवी; नवीन नियमाचे इरफान पठाणकडून स्वागत; BCCI चे आभार!
14
पितृपक्षात सोम प्रदोष शिवरात्री: ‘या’ गोष्टी अवश्य करा; पितृदोष मुक्तता, महादेव कृपा करतील!
15
"कुठलाही आजार वगैरे झालेला नाही"; सुशांत शेलारने सांगितलं वजन का आणि कसं कमी झालं!
16
₹100000 पार जाणार सोन्याचा भाव...? दिसतोय US Fed च्या निर्णयाचा परिणाम! या वर्षात झाली 30% वाढ
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना पितृपक्षाची शुभ सांगता, ऑक्टोबर आणेल अच्छे दिन; अपार यश-लाभ!
18
पितृपक्ष: एकाच दिवशी प्रदोष शिवरात्री शुभ संयोग; कसे करावे व्रत? पाहा, महात्म्य अन् मान्यता
19
धक्कादायक! गाडी नीट चालवायला सांगितली म्हणून पोलिसाची केली हत्या; दिल्लीतील घटना
20
आता IPL मधून माघार घेणाऱ्या खेळाडूला मोजावी लागणार मोठी किंमत; जाणून घ्या नवा नियम

चार कर्मचाऱ्यांना निलंबनाची नोटीस

By admin | Published: February 26, 2016 12:25 AM

कामात अनियमितता, हलगर्जीपणा करणाऱ्या महापालिकेतील चार कर्मचाऱ्यांना त्यांच्यावर निलंबनाची कार्यवाही करण्याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

कारवाई : शिक्षण, बाजार परवाना विभागाचा समावेशअमरावती : कामात अनियमितता, हलगर्जीपणा करणाऱ्या महापालिकेतील चार कर्मचाऱ्यांना त्यांच्यावर निलंबनाची कार्यवाही करण्याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. यात शिक्षण विभागातील तीन तर बाजार व परवाना विभागातील एका कर्मचाऱ्याचा समावेश आहे. शिक्षण विभागाच्या दोन सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांवरही कारवाई प्रस्तावित आहे. आयुक्तांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. आयुक्तांनी काही दिवसांपूर्वी शिक्षण विभागाला भेट दिली असता सेवापुस्तिकेत बऱ्याच नोंदी नसल्याचे दिसून आले. शिक्षण विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तिकेत नोंदी घेण्याची जबाबदारी असलेल्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कार्यवाही प्रस्तावित केली आहे. त्यानुसार प्रभारी शिक्षणाधिकारी विजय गुल्हाने यांनी शिक्षण विभागातील लिपीक विजय सुंदरानी, अरशी मिराज, राहुल वैद्य तर सेवानिवृत्त वरिष्ठ लिपीक शीतलकुमार चमनपुरे, बोरगावकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहेत. तसेच बाजार, परवाना निरीक्षक राजेंद्र दिघडे यांना देखील नोटीस बजावण्यात आलली आहे. नोटीसचे उत्तर येताच पुढील कारवाई केली जाईल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.