... तर दहावीच्या विद्यार्थ्यांना गुण सुधारण्याची संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:14 AM2021-04-23T04:14:40+5:302021-04-23T04:14:40+5:30
अमरावती : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्य शासनाने इयत्ता दहावीची परीक्षा रद्द केली. या परीक्षेसाठी नोंदणी केलेले विद्यार्थी शाळेतील ...
अमरावती : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्य शासनाने इयत्ता दहावीची परीक्षा रद्द केली. या परीक्षेसाठी नोंदणी केलेले विद्यार्थी शाळेतील अंतर्गत मूल्यमापनाने उत्तीर्ण होणार आहे. या पद्धतीने मिळालेल्या गुणांबाबत ते समाधानी नसतील, तर त्यांना गुण सुधारण्याची संधी शासन देणार आहे. बारावीच्या परीक्षेचे नवे वेळापत्रक लवकरच जाहीर करावे, अशी मागणी विद्यार्थ्यांमधून होत आहे.
बारावीची परीक्षा मे महिन्याच्या अखेर घेण्याचे नियोजन चालविल्याचे शिक्षण मंडळातून सांगण्यात येते. जिल्ह्यात बारावीचे विद्यार्थी संख्या आहे. बारावीचे नवे वेळापत्रक लवरच जाहीर करावे, अशी मागणी विद्यार्थी, पालकांकडून होत आहे.
------------------
विद्यार्थी, पालक काय म्हणतात?
दहावीच्या विद्यार्थ्यांचे अंतिम मू्ल्यमापन करताना पूर्व परीक्षेबरोबरच नववीतील गुणांचाही विचार करावा.
- नंदिनी मराठे, बडनेरा.
परीक्षा पुढे गेल्याने विद्यार्थ्यांच्घया मानसिकतेवर परिणाम होतो. त्यामुळे परीक्षचे सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर व्हावे.
- श्रृती शर्मा, अमरावती.
बारावीची परीक्षा घेणार असल्याचे शिक्षण विभागाने जाहीर केले. त्याचे नवे वेळापत्रक लवकरच जाहीर केल्यास आम्हा विद्यार्थ्यांवर मानसिक ताण येणार नाही.
- संघदीप चव्हाण, मोर्शी.
-----------------
शिक्षक संघटनेला काय वाटते?
राज्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय योग्यच आहे. कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षण, अभ्यासावरही परिणाम झाला आहे.
-राजेश सावरकर, प्रसिद्धी प्रमुख, प्राज्य राथमिक शिक्षक संघटना
दहावीची परीक्षा रद्दचा निर्णय दुर्देवी आहे. त्या रद्द करण्याऐवजी उशिरा घ्यायला हव्या होत्या. बारावीच्या परीक्षा होणार आहेत. त्यांच्याबाबत कोरोनाची भीती नाही का?
- विकास भालेराव, सदस्य राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समिती.
--------------------
मू्ल्यमापनात अडचण
काही शाळांमध्ये दहावीच्या पूर्वपरीक्षा झाल्या आहेत, तर काही शाळांमधील या परीक्षांना विद्यार्थ्यांना उपस्थित राहता आले नाही. त्याचे मूल्यमापन करण्यात अडचण येण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील आकडेवारी
दहावीचे विद्यार्थी : ४०६६३
बारावीचे विद्यार्थी: ३५१३२