शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : अडचणीची परिस्थिती वा द्विधा मनःस्थिती; एकनाथ शिंदे जातात सातारच्या गावी! यावेळी काय घडणार?
2
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"
3
तिढा सुटेना, महायुतीचे नेते पुन्हा दिल्लीला जाणार, का होतोय सत्तास्थापनेस उशीर? 
4
Video: 'सुपरमॅन' कॅच! तुफान वेगाने जाणाऱ्या चेंडूवर फिल्डरने हवेतच घेतली चित्त्यासारखी झेप
5
एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा; राजकीय गदारोळात उदय सामंतांकडून महत्त्वाचा खुलासा
6
गोंदिया-कोहमारा मार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात! ११ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
7
"वाढीव मतदानाचे व्हिडीओ चित्रीकरणासह पुरावे सादर करा", नाना पटोलेंचं निवडणूक आयोगाला पत्र
8
"लॉरेन्स बिश्नोईचा जेलमधून शूटर्सना कॉल; म्हणाला, पोलिसांना घाबरु नका, आपल्याकडे वकिलांची फौज"
9
PAN 2.0 नंतर सरकार आता EPFO 3.0 आणण्याच्या विचारात; ATM मधूनच करता येणार 'हे' काम
10
Maharashtra Politics : मोठी बातमी! महायुतीची बैठक रद्द, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्याला जाणार
11
भारतीय गुंडांचा अमेरिकेत 'डंकी'पद्धतीने प्रवेश; लॉरेन्स बिश्नोई टोळीचेही आवडते ठिकाण बनले
12
रोल्स रॉयस घ्यायची असेल तर डाऊन पेमेंट किती करावे लागणार? EMI किती बसणार... जाणून घ्यायला काय हरकत आहे...
13
Shubman Gill कमबॅकसाठी सज्ज; हा घ्या तो १०० टक्के फिट असल्याचा पुरावा (VIDEO) 
14
EPFO कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; ३० नोव्हेंबरपर्यंत करा 'हे' काम; अन्यथा होईल मोठं नुकसान
15
अमित शाहांच्या भेटीवेळी चेहऱ्यावर नाराजी, व्हायरल होत असलेल्या फोटोबाबत एकनाथ शिंदे म्हणाले...  
16
गुजरातमध्ये बनावट ऑस्ट्रेलियन डॉलर्सची छपाई, पोलिसांनी चौघांना घेतले ताब्यात
17
'कोणतीही कारवाई करू नका'; जामा मशीद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे कनिष्ठ न्यायालयाला निर्देश
18
F&O मध्ये ४५ नवे स्टॉक्स : Paytm, जिओ, फायनान्शिअल, LIC; Yes Bank सारख्या शेअर्सची एन्ट्री, काय फरक पडणार?
19
PM मोदींच्या सुरक्षेसाठी महिला 'एसपीजी कमांडो', काय आहे व्हायरल फोटोचं सत्य?
20
गोंदियात भीषण अपघात! शिवशाही बस उलटली, ११ जणांचा मृत्यू; मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

चालान करण्याचे अखेर 'त्यांचे' धाडस झालेच नाही

By admin | Published: February 06, 2017 12:15 AM

कुण्या सामान्य नागरिकाने वाहतूक नियम मोडला तर गुंडांप्रमाणे धावून त्याच्या वाहनाची चक्क चावी काढून घेणारे ...

नियम तोडण्यासाठी अंबर दिवा ? : अधिकाऱ्यांच्या वाहनांवर कारवाई कशी करणार, वाहतूक शाखेचा सवालअमरावती : कुण्या सामान्य नागरिकाने वाहतूक नियम मोडला तर गुंडांप्रमाणे धावून त्याच्या वाहनाची चक्क चावी काढून घेणारे वाहतूक पोलीस आणि अधिकारी राजरोसपणे नियम मोडणाऱ्या अधिकाऱ्यांसमोर कसे हतबल आणि लाचार होतात, याचा प्रत्यय मोर्शी मार्गावर विभागीय क्रीडा संकुलासमोर रविवारी आला. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील मतमोजणी प्रक्रिया विभागीय क्रीडा संकुलच्या सभागृहात ६ व ७ फेबु्रवारी रोजी होणार आहे. त्याअनुषंगाने पाचही जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी व अन्य कर्मचारी बैठकीनिमित्त रविवारी क्रीडा संकुल येथे दाखल झाले होते. क्रीडा संकुल व विधी महाविद्यालय या दोन ठिकाणी वाहनतळ व्यवस्था उपलब्ध करण्यात आलेली आहे. मात्र, तरीसुद्धा बहुतांश शासकीय अधिकाऱ्यांची वाहने रविवारी क्रीडा संकुलासमोरील मुख्य मार्गावरच पार्क करण्यात आली होती. सकाळी ११ वाजतापासून ही वाहने रस्त्यावर उभी असल्यामुळे वाहतूक व्यवस्था खोळबंली होती. शासकीय वाहने असल्यामुळे त्यांना हटकणार कोण, असा पेच निर्माण झाला होता. अधिकाऱ्यांची वाहने 'राँंग साईड'ने आणणे आणि भर रस्त्यावर पार्क करणे हा सिलसिला सुरू झाला. रस्ता तुंबला. किरकोळ अपघात घडू लागले. बाचाबाची होऊ लागली. लोक तक्रारी घेऊन 'लोकमत'कार्यालयात येऊ लागले. लोकमत कार्यालयातून वाहतूक शाखेला यासंबंधाने माहिती देण्यात आली. बराच वेळ कुणीच फिरकले नाही. मुद्याचे गांभीर्य कळावे, यासाठी वाहतूक शाखेचे एसीपी पी.डी.डोंगरदिवे, निरीक्षक अर्जुन ठोसरे आणि नियंत्रण कक्षाला माहिती देण्यात आली. तरीही बराच वेळ सूत्रे हलली नाहीत. वारंवार फोन केल्यावर पोलीस व्हॅन क्रीडा संकुलानजीक पोहोचली. शासकीय अधिकाऱ्यांची वाहने बघून त्यांचे अवसान गळाले. आम्ही कारवाई करू शकणार नसल्याचे येताक्षणीच त्यांनी स्पष्ट केले. उपस्थित वाहनचालकांना विनवणी करून त्यांनी वाहन इतरत्र हलविण्यास सांगितले. योग्य प्रतिसाद मिळत नसल्याचे बघून त्यांनी काढता पाय घेतला. त्यानंतर काही वेळाने वाहतूक शाखेतील उपविनिरीक्षक पावेल बेले हे अधिकारी क्रीडा संकुलासमोर पोहोचले. त्यांनीही स्थितीचा आढावा घेतला. मात्र, शासकीय अधिकाऱ्यांच्या वाहनांवर कारवाई करण्याचे धाडस या अधिकाऱ्याचेही झाले नाही. हतबलता दर्शवून ते आल्यापावलीच माघारी फिरले. प्रथम श्रेणी, दंडाधिकार बहाल असलेल्या अधिकाऱ्यांच्या अशा बेशिस्त वर्तणुकीतून सामान्यजनांनी आणि तरुणांनी काय बोध घ्यावा, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. (प्रतिनिधी)रविवारी वाहतूक शाखेला सुटीआठवडाभर वाहतूक नियंत्रणाची जबाबदारी सांभाळणारे बहुतांश वाहतूक अधिकारी व कर्मचारी हे रविवारी सुटीवर असल्याचे आढळून आले. क्रीडा संकुलासमोरील मार्गावर काही वाहने रस्त्यावर उभी असल्याची माहिती देण्यासाठी लोकमतने सर्वप्रथम सहायक आयुक्त पी.डी.डोंगरदिवे यांच्या मोबाईलवर दुपारी १२ वाजता संपर्क केला. त्यांनी मी सुटीवर असल्याचे सांगून संब्ांंधित अधिकाऱ्यांना पाठविण्याचे आश्वासन दिले. मात्र, बराच वेळ वाहतूक शाखेतून कुणीही पोहोचले नाही. त्यानंतर दुपारी १२.२० वाजता पोलीस निरीक्षक अर्जुन ठोसरे यांच्या मोबाईलवर सपर्क केला असता त्यांनीही मी बाहेर गावी असल्याचे सांगून लवकरच पोलीस पाठवित असल्याचे आश्वासन दिले. मात्र, कुणीही आले नाही. १२.२४ वाजता पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती देण्यात आली. १२.४१ वाजता दंगा नियंत्रक वाहन असे नमूद असलेली लॉरी (क्रमांक एमएच २७ ए-९५८१) क्रीडा संकुलासमोर पोहचली. त्यांनी काही चालकांना वाहन काढण्याची विनंती केली नि ते निघून गेले.