तिसऱ्या दिवशीही अतिक्रमणावर चालला गजराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 12:55 AM2018-11-16T00:55:24+5:302018-11-16T00:56:20+5:30

महापालिकेच्या अतिक्रमण विभागाद्वारा गुरूवारी वलगाव मार्गावरील जमील कॉलनी व हबीबनगरातील अतिक्रमण हटविण्यात आले. मनपा आयुक्त संजय निपाणे यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.

On the third day, Gajraj went on an encroachment | तिसऱ्या दिवशीही अतिक्रमणावर चालला गजराज

तिसऱ्या दिवशीही अतिक्रमणावर चालला गजराज

Next
ठळक मुद्देसंवेदनशील भागात मोहीम : जमील कॉलनी, हबीबनगरातील अतिक्रमण मोकळे

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महापालिकेच्या अतिक्रमण विभागाद्वारा गुरूवारी वलगाव मार्गावरील जमील कॉलनी व हबीबनगरातील अतिक्रमण हटविण्यात आले. मनपा आयुक्त संजय निपाणे यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.
यात वालकट कंपाऊंडमधील दोन भंगार दुकानांसह रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात आले. सहायक आयुक्त तौसिफ काझी, अतिक्रमण पथकप्रमुख गणेश कुत्तरमारे, उपअभियंता प्रमोद इंगोले, पोलीस निरीक्षक मानकर, अभियंता प्रदीप वानखडे, आनंद जोशी, मनोज शहाळे, जयंत काळमेघ, सचिन मांडवे, नाझीम, प्रवीण भेंडे, चैतन्य काळे, ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक तसेच झोनमधील अभियंता, अतिक्रमण निरीक्षक प्रविण इंगोले, उमेश सवई, स्वास्थ निरीक्षक, पोलीस कर्मचारी उपस्थित होते. सदर कार्यवाही निरंतर सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. रस्त्यावरील अनधिकृत बांधकाम तसेच अतिक्रमण काढून ते पादचारी मागार्साठी मोकळे करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
मोहीम न थांबल्यास
महापालिकेच्या गेटसमोर घेणार विष
हॉकर्स अ‍ॅक्ट २०१४ चे उल्लंघन करून महापालिका अतिक्रमणांवर कारवाई करीत आहे. हॉकर्ससाठी कुठलीही उपाययोजना नाही, हॉकर्स झोनची निश्चिती नाही. येत्या पाच दिवसांत महापालिकेने हॉकर्सवरील अतिक्रमणाची कारवाई न थांबविल्यास एक हजार हॉकर्स महापालिकेच्या गेटसमोर विष प्राषण करतील, असा इशारा स्वाभिमानी हॉकर्स युनियनचे शहर अध्यक्ष गणेश मारोटकर यांनी दिला आहे.

Web Title: On the third day, Gajraj went on an encroachment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.