आरोग्य विभागाच्या ताफ्यात तीन बाईक ॲम्बुलन्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:14 AM2021-09-22T04:14:54+5:302021-09-22T04:14:54+5:30
मेळघाटातील मुलांचे आरोग्य जपण्यासाठी प्लॅन इंडियाचा पुढाकार अमरावती : मेळघाटातील लहान मुलांचे आरोग्य जपण्यासाठी आरोग्य विभागाच्या दिमतीला तीन नव्या ...
मेळघाटातील मुलांचे आरोग्य जपण्यासाठी प्लॅन इंडियाचा पुढाकार
अमरावती : मेळघाटातील लहान मुलांचे आरोग्य जपण्यासाठी आरोग्य विभागाच्या दिमतीला तीन नव्या बाईक ॲम्बुलन्स उपलब्ध झाल्या आहेत.
आरोग्यसेवा पुरविण्याबाबत प्लॅन इंडिया आधीपासूनच मेळघाटात काम करत आहे. मेळघाटातील आरोग्याबाबतच्या सुविधा पाहता या संस्थेने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला तीन बाईक ॲम्बुलन्स देण्याचे ठरविले होते. तसा पत्रव्यवहारही संबंधित कार्यालयाकडे करण्यात आला होता. दरम्यान जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्च महिन्यातील पत्रानुसार प्लॅन इंडिया सोमवार २० सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेला तीन बाईक अँबुलन्स उपलब्ध करून दिल्या आहेत. दुचाकीला जोडलेले आहे. अँबुलन्सला ऑक्सिजन सिलिंडर, ऊन, वारा, पाऊस यापासून रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक किट आदी साहित्य देण्यात आले आहे. त्यामुळे आता अत्यंत दुर्गम भागातील रुग्णांनाही रुग्णालयापर्यंत पोहचविण्यास मोठी मदत होईल, असा आशावाद जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले यांनी व्यक्त केला. यावेळी प्रशासकीय अधिकारी सुभाष सिडाम, अभ्यंकर, एनआरएचएमचे अशोक कोठारी, प्लॅन इंडियाचे संजीव बेन आदी उपस्थित होते.
बॉक्स
यापूर्वीही मिळालेल्या पाच बाईक
मेळघाटातील आदिवासी बांधवांना वेळेवर आरोग्य सेवा मिळावी याकरिता भारत विकास ग्रुप तर्फे यापूर्वी पाच बाईक दिल्या आहेत. जे रुग्ण दवाखान्यात येऊन उपचार घेऊ शकत नाही. अशांना घरपोच आरोग्य सेवा देता यावी यासाठी या बुलेट बाईक देण्यात आल्या आहेत. त्याचा वापर केला जातो सध्या हतरू, हरिसाल, टेंब्रुसोडा, बैरागड आणि गौरखेडा या प्राथमिक आरोग्य केंद्रात बाईक कार्यरत आहेत.