(फोटो/मोहोड./मेल)
अमरावती : कोरोना संसर्गाशी लढणाऱ्या पहिल्या फळीतील २३०० जणांना कोरोनाची लस देण्यात येणार आहे. याविषयी महापालिकास्तरावर मायक्रो प्लानिंग सुरू आहे. दरम्यान तीन २२० लीटर क्षमतेचे आईस लाईंड रेफ्रीजरेटर (आयएलआर) सोमवारी महापालिकेच्या आरोग्य विभागाला उपलब्ध झाले आहेत. शहरी आरोग्य केंद्रासाठी उर्वरित १३ आयएलआर पाठविण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.
कोरोना लसीकरणासाठी महापालिकेत दोन महिन्यांपासून बौठकांचा रतीब सुरू आहे. याविषयी दर आठवड्यात जिल्हाधिकारी व आयुक्तांद्वारा तयारीचा आढावा सुरू आहे. सद्यस्थितीत पहिल्या टप्प्यात आरोग्य विभाग व खासगी वौद्यकीय सेप्तीमधील २३०० जणांची माहिती संकलित करून संगणकांत भरण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. शहरातील १३ आरोग्य केंद्रांत ही लस दिली जाईल. यात ६० एएनएम, १३ डॉक्टर्सकडे ही जबाबदारी राहील. दरम्यान बुधवारीदेखील या तयारीचा आढावा घेण्यात येणार असल्याचे महापालिकेचे वौद्यकीय आरोग्य अधिकारी विशाल काळे यांनी लोकमतला सांगितले.