शहरं
Join us  
Trending Stories
1
"रावसाहेब दानवेंना मुख्यमंत्री करा", युवकाने रक्ताने लिहिले पंतप्रधानांना पत्र
2
महायुतीचे ठरले! अखेर ‘या’ तारखेवर शिक्कामोर्तब; पंतप्रधान मोदी शपथविधीला राहणार उपस्थित
3
काळजीवाहू CM एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीविषयी डॉक्टरांनी दिली महत्त्वाची अपडेट; म्हणाले...
4
काँग्रेसची कठोर भूमिका! बेशिस्त वर्तन खपवणार नाही, पक्ष प्रतिमा मलिन करणाऱ्यांवर कारवाई
5
"ज्यांना कुणाला वाटते, त्यांनी ईव्हीएम हॅक करून दाखवावे"; दानवेंचं जानकरांना खुलं आव्हान
6
“पक्षाने फक्त तिकीट दिले, सभा-सामग्री नाही, वाऱ्यावर सोडले”; काँग्रेस उमेदवाराचा आरोप
7
“काळजीवाहू CM संकल्पनाच नाही, राज्यात राष्ट्रपती राजवटीची स्थिती”; वकिलांचे कायद्यावर बोट!
8
“एकनाथ शिंदेंवर PM मोदी-अमित शाह यांचे भावाप्रमाणे प्रेम”; भाजपा नेत्याचे विधान चर्चेत
9
VIDEO: अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न; तरुणाला लोकांनी पकडून केली मारहाण
10
"...तर आम्ही आपल्या विरोधात उमेदवार देणार नाही"; दिल्ली CM आतिशी यांची भाजप नेत्याला अनोखी ऑफर
11
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रकृती बिघडली, दरे गावी बंगल्यावर डॉक्टरांची टीम दाखल 
12
'भाजपमध्ये नेतृत्वावरून संभ्रम, त्यामुळेच सत्तास्थापनेला विलंब'; अंबादास दानवेंचा मोठा दावा
13
'जय' हो..! पाक 'हायब्रिड मॉडेल'साठी 'कबूल'; आता कसं भारत म्हणेल तसं! पण ठेवल्या या २ अटी
14
"मुख्यमंत्री भाजपचाच, उरलेल्या दोन पक्षांना..."; अजित पवारांकडून मोठी घोषणा
15
ज्या EVM वर लोकसभा जिंकली, त्यावरच नीलेश लंकेंनी शंका घेतली; म्हणाले, “आता विधानसभेला...”
16
“मी स्वतः इंजिनिअर, मला सगळे माहिती आहे, EVM हॅक करता येते”; महादेव जानकर थेटच सांगितले
17
“EVM सेट केले जाते हे दाखवले होते, विश्वास ठेवला नाही, पण आता...”; शरद पवारांचा मोठा दावा
18
"बांगलादेशातील हिंदूंसाठी लवकरात लवकर..."; केंद्र सरकारला संघाचं मोठं आवाहन
19
"अमित शाह यांनी गुन्हा नाही तर केजरीवालांना..."; भाजपाच्या आरोपावर संजय सिंह यांचा पलटवार
20
IND vs PAK : युवीची कार्बन कॉपीच! Nikhil Kumar ची बॅट तळपली; तो आउट झाला अन् मॅच फिरली

आज चोख बंदोबस्त, ४३६ पोलीस तैनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 12:48 AM

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी बडनेरा रोड स्थित नेमाणी गोदामातील स्ट्राँग रूम व बाहेरील परिसरात एकूण ४३६ पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. याशिवाय ग्रामीण भागातील १२ पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रतिबंधक उपाययोजनांसाठी स्ट्राइकिंग फोर्स तैनात राहणार आहे.

ठळक मुद्देग्रामीण हद्दीत १२ ठिकाणी स्ट्राइकिंग फोर्स, मेटल डिटेक्टरने तपासणी, साध्या वेशात पोलीस ठेवणार लक्ष

अमरावती : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी बडनेरा रोड स्थित नेमाणी गोदामातील स्ट्राँग रूम व बाहेरील परिसरात एकूण ४३६ पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. याशिवाय ग्रामीण भागातील १२ पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रतिबंधक उपाययोजनांसाठी स्ट्राइकिंग फोर्स तैनात राहणार आहे.शहर पोलीस विभागाने स्ट्राँग रूमच्या आतील व बाहेरील परिसरात तगडा बंदोबस्त लावला आहे. पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनात तीन पोलीस उपायुक्तांच्या नेतृत्वात १५ पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक असे एकूण ३२ पोलीस अधिकारी, २७० पोलीस कर्मचारी, ४५ महिला पोलीस, ४ स्ट्राइकिंग फोर्स, सीआरपीएफ व एसआरपीएफ प्लॉटूनमध्ये ७० जवान मतमोजणीच्या बंदोबस्ताची धुरा सांभाळणार आहेत. याशिवाय स्ट्राँग रूम पूर्वीपासून तैनातीत असणाऱ्या ४० पोलीस तैनात राहणार आहेत. स्ट्राँग रूम परिसरातील हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी बिट मार्शल, सीआर मोबाईल व्हॅन, दामिनी पथक व पोलीस ठाण्यातील पोलीस गस्ती राहणार आहे. तसेच बॉम्ब शोधक व नाशक पथक, वायरलेस सेक्शन, मेटल डिटेक्टर डोअर फ्रेम व हॅन्ड होल्ड मेटल डिटेक्टरद्वारे नागरिकांची तपासणी केली जाणार आहे. मतमोजणीवेळी गुन्हे शाखा व दहशतवाद विरोधी पथकातील १० पोलीस नागरिकांच्या हालचालीवर साध्या वेशात लक्ष ठेवणार आहेत. ग्रामीण हद्दीतही प्रतिबंधित उपाययोजना म्हणून १२ ठिकाणी १२० पोलिसांची स्ट्राइकिंग फोर्स तैनात केली. प्रत्येक चौकात १० पोलीस पहारा देणार आहेत.राजकीय पक्षांचे कार्यालये, नेत्यांच्या निवासस्थानांना सुरक्षाविविध राजकीय पक्षांच्या कार्यालये व नेत्यांच्या निवासस्थाला पोलिसांची सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. ही कार्यालये गाडगेनगर, राजापेठ, नांदगाव पेठ व कोतवाली हद्दीत आहेत.

टॅग्स :Policeपोलिस