रेल्वेत बोगस आदिवासी कर्मचाऱ्यांची शोधमोहिम

By admin | Published: August 17, 2016 12:04 AM2016-08-17T00:04:41+5:302016-08-17T00:04:41+5:30

आदिवासी समाजाच्या नावे बनावट जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करुन रेल्वेत विविध पदे काबीज ...

Trail of bogus tribal workers in railway | रेल्वेत बोगस आदिवासी कर्मचाऱ्यांची शोधमोहिम

रेल्वेत बोगस आदिवासी कर्मचाऱ्यांची शोधमोहिम

Next

दोघांना नोटीस : रेल्वे कर्मचारी संघटनांची तक्रार
अमरावती : आदिवासी समाजाच्या नावे बनावट जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करुन रेल्वेत विविध पदे काबीज करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची शोधमोहिम सुरू झाली आहे. बडनेरा रेल्वे स्थानकावरील दोन चालकांना मूळ कागदपत्रे सादर करण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे. २२ आॅगस्ट रोजी त्यांना व्यक्तिश: हजर राहण्याचा सूचनाही देण्यात आली आहेत.
नॅशनल रेल्वे कर्मचारी संघटनेने रेल्वे विभागात आदिवासींच्या हक्कावर गदा आणणारे बोगस आधिकारी, कर्मचारी शोधून काढण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यानुसार येथील विभागीय अनुसूचित जमाती प्रमाणपत्र समितीकडे १९ रेल्वे कर्मचाऱ्यांनी बनावट कागदपत्रे सादर करून नोकरी बळकाविल्याची तक्रार करण्यात आली आहे. यात बहुतांश कर्मचारी वाहक, चालकपदी कार्यरत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात दोन कर्मचाऱ्यांना मूळ कागदपत्रे सादर करण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे. हे दोघेही रेल्वेत चालकपदी कार्यरत आहेत. अनुसूचित जमाती जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करून वर्ग १ ते ४ ची विविध पदांवर गैर आदिवासी कार्यरत आहेत. वरिष्ठ पदांवरही बोगस आदिवासी अधिकारी ठाण मांडून असल्याने अन्य बोगस आदिवासी कर्मचाऱ्यांना अभय मिळत असल्याचे वास्तव आहे. एकट्या मध्य रेल्वे भुसावळ विभागात सुमारे २५० ते ३०० अधिकारी, कर्मचारी गैरआदिवासी असल्याचा दावा रेल्वे कमचारी संघटनांचा आहे. बनावट कागदपत्रे सदर करून खऱ्या आदिवासींच्या नोकऱ्या बळकाविणाऱ्यांवर ठोस कारवाई होत नसल्याची ओरड आहे. चालक, वाहक अशा महत्त्वाच्या पदी बोगस आदिवासींची भरती कशी करण्यात आली? हा संशोधनाचा विषय आहे. दोन वर्षांपूर्वी दिलेल्या तक्रारीची आता अनुसूचित जात प्रमाणपत्र समितीने घेतली आहे. १९ कर्मचाऱ्यांचे कागदपत्रे बनावट असताना केवळ दोनच कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे ‘एसटी’ जात पडताळणी समितीचा कारभार कसा चालतो, हे स्पष्ट होते. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या बनावट जात पडताळणी प्रमाणपत्राच्या तक्रारीनुसार किती कर्मचाऱ्यांना कागदपत्रे सादर करण्यासाठी नोटीस बजावण्यात आली. याविषयी अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र समितीचे प्रमुख पाटीेल यांच्याशी विचारणा केली असताना त्यांनी हे सांगता येणार नाही, असे सांगितले.

अमरावती, नागपूर येथे सर्वाधिक बोगस कर्मचारी
रेल्वे आदिवासींच्या नावे बनावट कागदपत्रे सादर करून नोकरी बळकावणारे अमरावती, नागपूर येथे मोठ्या संख्येने आहेत. अमरावतीत १९, तर नागपुरात १७ बोगस आदिवासी कर्मचारी असल्याची तक्रार आहे. बोगस आदिवासी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाईसाठी पाठपुरावा सुरू असला तरी अधिकाऱ्यांची अनास्था ही यात सर्वात मोठी अडसर असल्याचे वास्तव आहे.

जात पडताळणी समितीने जलद गतीने प्रकरणे हाताळणे अपेक्षित आहे. तक्रारीवर लक्ष दिले जात नाही. ही समिती खरेच जात प्रमाणपत्र पडताळणी समिती आहे किंवा नाही? हादेखील संशोधनाचा विषय आहे. ठाकरे आणि बद्रे नामक दोन रेल्वे कर्मचाऱ्यांना नोटीस बजावल्याचे पत्र समितीकडून प्राप्त झाले आहे.
- नंदराज मघाळे, माजी सचिव, नॅशनल रेल्वे मजदूर संघ बडनेरा

Web Title: Trail of bogus tribal workers in railway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.