अवैध जनावरे वाहून नेणाऱ्या वाहनाला ट्रॅव्हल्सची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:14 AM2021-04-21T04:14:16+5:302021-04-21T04:14:16+5:30

अमरावती : अवैधरित्या जनावरांना कोंबून नेणाऱ्या पीकअप व्हॅनला ट्रॅव्हल्सने दिलेल्या जबर धडकेत पिकअप व्हॅनचा क्लिनर जागीच ठार झाला तर ...

Travels hit a vehicle carrying illegal animals | अवैध जनावरे वाहून नेणाऱ्या वाहनाला ट्रॅव्हल्सची धडक

अवैध जनावरे वाहून नेणाऱ्या वाहनाला ट्रॅव्हल्सची धडक

Next

अमरावती : अवैधरित्या जनावरांना कोंबून नेणाऱ्या पीकअप व्हॅनला ट्रॅव्हल्सने दिलेल्या जबर धडकेत पिकअप व्हॅनचा क्लिनर जागीच ठार झाला तर वाहनांमध्ये असलेल्या आठ गायींसह दोन गोवंशाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी साडेसहा वाजताच्या दरम्यान रहाटगाव रिंगरोडनजीक घडली. घटनेत पिकअप व्हॅनचा चालकदेखील गंभीर जखमी असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नासीर खान अकबर खान असे अपघातात ठार झालेल्या क्लिनरचे नाव आहे तर संगम मोहोड हा चालक गंभीर जखमी आहे.

पहाटे साडेसहा वाजताच्या दरम्यान पिकअप व्हॅन क्र. एम एच २७, बी एक्स ४८०६ अवैधरित्या जनावरे घेऊन अमरावतीकडे भरधाव जात असताना व्हॅनच्या चालकाने कोणताही विचार न करता रिंगरोडच्या दिशेने वाहन वळविले त्यामुळे विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रॅव्हल्स क्र. एम एच २०,इ एल ८०० ने पीकअप व्हॅनला जोरदार धडक दिली. दोन्ही वाहने भरधाव असल्याने ट्रॅव्हल्सने दूरपर्यंत पिकअप व्हॅनला घासत नेले. यामध्ये क्लिनर नासिर खान अकबर खान हा जागीच ठार झाला तर चालक संगम मोहोड गंभीर जखमी झाला. शिवाय वाहनांमध्ये कोंबून नेण्यात येत असलेल्या ८ गायी व २ गोवंशचादेखील अपघातात मृत्यू झाला.

घटनेची माहिती नांदगाव पेठ पोलिसांना कळताच तातडीने पोलीस ताफा घटनास्थळी पोहचला. जखमी चालकाला तसेच मृतकाला रुग्णवाहिकेच्या मदतीने जिल्हा सामान्य रुग्णालयात पोहचविले तर अपघातात मृत जनावरांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

-------------------

पोलिसांच्या हप्तेखोरीमुळे अवैध वाहतूक वाढली

महामार्गावरील पोलिसांच्या हप्तेखोरीमुळे जनावरांची अवैध वाहतूक वाढली असल्याचा आरोप बजरंग दल विभाग संयोजक संतोषसिंह ऊर्फ बाबू गहरवार यांनी केला आहे. दररोज वाहनांमध्ये अशा प्रकारची जनावरे कोंबून नेल्या जात आहेत. मागील आठवड्यात एका ट्रकचालकाने टोल नाक्यावरील खांब तोडून पळ काढला होता. त्यासंबंधी पोलीस आयुक्त व जिल्हाधिकारी यांना तक्रार देण्यात आली; मात्र अद्यापही त्यावर कोणत्याच प्रकारची कार्यवाही करण्यात आली नाही, असेही त्यांनी म्हटले.

Web Title: Travels hit a vehicle carrying illegal animals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.