लोकमत न्यूज नेटवर्कधारणी : सत्र २०१८-१९ मध्ये बदलीपात्र शिक्षक मेळघाटात सेवा देण्याकरिता पोहोचले नसल्याने 188 पदे रिक्त होती. आता नवीन सत्रात तरी आदिवासी विद्यार्थ्यांना विद्यादानाकरिता गुरुजी मिळणार काय, असा प्रश्न आदिवासी विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांसमोर आहे.मेळघाटातील धारणी पंचायत समिती अंतर्गत पहिली ते चौथी आणि पहिली ते आठवीपर्यंतच्या जिल्हा परिषदेच्या १६७ शाळा आहेत. त्या जिल्हा परिषद शाळांमध्ये सद्यस्थितीत ९५३ शिक्षकांची मंजूर पदे आहेत. त्यापैकी सध्या ७६५ शिक्षक कार्यरत आहेत. १८८ पदे रिक्त, तर ३५ शिक्षक अतिरिक्त आहेत. यंदा पुन्हा शिक्षकांची बदली प्रक्रिया होत असून, नवीन सत्रात तरी या आदिवासीबहुल भागात गुरुजी मिळतील की घोळ व त्याविरोधातील न्यायालयीन प्रक्रियेत सत्र निघून जाणार, असा प्रश्न विद्यार्थ्यांसह पालकांना पडला आहे.न्यायालयात जाणाऱ्या शिक्षकांचे काय ?सपाटीवरील शिक्षक मेळघाटात बदली झाल्यानंतर न्यायालयाचा आधार घेऊन सपाटीवरच राहतात. त्यामुळे मेळघाटात रिक्त पदांची संख्या वाढतच आहे. संपूर्ण सत्र ते अतिरिक्त राहून काढतात. याचा फटका शासनाला बसत आहे.कुंड येथील शाळा ठरली अपवादशासनाने मागील सत्रात एनआयसीमार्फत आॅनलाइन बदली प्रक्रिया राबविली. अतिदुर्गम कुंड येथील जिल्हा परिषद शाळेत एकहि शिक्षक पोहोचला नाही. शाळा उघडायलाही शिक्षक नव्हते. त्यावेळी कुटंगा जि.प. शाळेतून प्रतिनियुक्तीवर शिक्षक पाठविण्यात आले होते. ते सध्याही तेथेच प्रतिनियुक्तीवर आहेत.बीईओचा प्रभार नुकताच मिळाला असून, आधीच्या अधिकाऱ्यांनी पंचायत समितीतील बदली झालेल्या शिक्षकांना एकाच वेळी कार्यमुक्त केले. बदलीपात्र शिक्षक रुजू होण्याची वाट त्यांनी बघितली नाही. त्यामुळे पदे रिक्त राहिली आहेत.- बंडू पटेलगटशिक्षणाधिकारी, धारणीअतिदुर्गम असल्याचे सांगून न्यायालयात धाव घेण्याचे कारणच नाही. कारण इतरही विभागात महिला व पुरुष कर्मचारी मेळघाटात कार्यरत आहेत. न्यायलायात आम्ही बाजू मांडली. मेलघाटातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानावर तोडगा लवकरच निघेल.- मनीषा खत्री, सीईओ, जि.प.
आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षक मिळणार काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2019 1:36 AM
सत्र २०१८-१९ मध्ये बदलीपात्र शिक्षक मेळघाटात सेवा देण्याकरिता पोहोचले नसल्याने 188 पदे रिक्त होती. आता नवीन सत्रात तरी आदिवासी विद्यार्थ्यांना विद्यादानाकरिता गुरुजी मिळणार काय, असा प्रश्न आदिवासी विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांसमोर आहे.
ठळक मुद्दे धारणी पंचायत समिती : मेळघाटात १८८ पदे रिक्त