५५३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल वाजला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:30 AM2020-12-12T04:30:32+5:302020-12-12T04:30:32+5:30

अमरावती: एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील ५५३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने ११ डिसेंबर ...

The trumpet of 553 Gram Panchayat elections sounded | ५५३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल वाजला

५५३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल वाजला

Next

अमरावती: एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील ५५३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने ११ डिसेंबर रोजी जाहीर केला. या ग्रामपंचायतींमध्ये १५ जानेवारी रोजी मतदान होईल. मतमोजणी १८ जानेवारी रोजी होणार आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने संपूर्ण जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे.

५५३ ग्रामपंचायतींसाठी प्रारूप मतदार यादी १ डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली. त्यावर ७ डिसेंबरपर्यंत हरकती घेण्यात आल्या. ९ डिसेंबर रोजीच्या सुधारित कार्यक्रमानुसार अंतिम मतदार यादी १४ डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तत्पूर्वी, ११ डिसेंबरला निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत ती कायम राहणार आहे. या कालावधीत मतदारांवर प्रभाव पडेल अशी कोणतीही कृती अथवा घोषणा मंत्री, खासदार, आमदार व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकाऱ्यांना करता येणार नाही. उमेदवारी अर्ज ऑनलाईन दाखल करावा लागेल तसेच मतदान हे सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या कालावधीत राहणार असल्याचेही आयोगाने स्पष्ट केले आहे.

बॉक्स

असा आहे निवडणूक कार्यक्रम

तहसीलदारांकडून निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करणे -१५ डिसेंबर. उमदेवारी अर्ज दाखल करणे २३ ते ३० डिसेंबर (२५, २६ व २७ डिसेंबरची सुटी वगळून). उमेदवारी अर्जाची छाननी - ३१ डिसेंबर. अर्जांची माघार - ४ जानेवारी. चिन्हवाटप व उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे - ४ जानेवारी (दुपारी ३ पर्यंत). मतदान १५ जानेवारी. मतमोजणी १८ जानेवारी.

बॉक्स

तालुकानिहाय ग्रामपंचायती

तालुका ग्रामपंचायत सदस्य प्रभाग

अमरावती ४६ १५४ ४१६

भातकुली ३६ ११६ ३१२

तिवसा २९ ०९८ २६१

दर्यापूर ५० १६३ ४४४

मोशी ३९ १३१ ३४९

वरूड ४१ १३९ ३९७

अंजनगाव ३४ ११७ ३१२

अचलपूर ४४ १४७ ३९९

धारणी ३५ १२१ ३३३

चिखलदरा २३ ०७१ १९९

नांदगाव खं ५१ १५९ ४१९

चांदूर रेल्वे २९ ९३ २३५

चांदूर बाजार ४१ १४० ३८१

धामणगाव रे ५५ १७४ ४५७

एकूृण ५५३ १८२३ ४८९६

बॉक्स

१८२३ प्रभागांमधून ४८९६ सदस्य निवडणार

जिल्हाभरात ५५३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवणूकीसाठी होऊ घातलेल्या मतदात प्रक्रियेद्वारे १८२३ प्रभागांमधून सुमारे ४ हजार ८९६ सदस्य मतदार आपल्या ग्रामपंचायतींचे सदस्य निवडणार आहेत.

Web Title: The trumpet of 553 Gram Panchayat elections sounded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.