शहरं
Join us  
Trending Stories
1
"जनतेचा ५ महिन्यात कौल बदलला त्याला काय करणार"; बाबा आढावांच्या भेटीनंतर अजितदादांचा सवाल
2
“EVM सेट केले जाते हे दाखवले होते, विश्वास ठेवला नाही, पण आता...”; शरद पवारांचा मोठा दावा
3
ट्रकमध्ये पैसे, ३६ नोटा मोजण्याच्या मशीन्स; भारतातील सर्वात मोठ्या IT छाप्यात काय सापडलं?
4
काही नाराजी असेल तर उघडपणे व्यक्त करू; संजय शिरसाट यांचे वक्तव्य चर्चेत!
5
ना बिग बी, ना सलमान-विराट, हा अभिनेता भरतो सर्वात जास्त टॅक्स, टॉप ५मधून अक्षय कुमार बाहेर
6
निकालाबाबत शंका, इव्हीएमवर संशय, राज्यातील या पराभूत उमेदवारांनी EVM पडताळणीसाठी केला अर्ज 
7
महायुतीत बंडखोरी करणाऱ्या समीर भुजबळांची राजकीय दिशा काय?; छगन भुजबळ म्हणाले..
8
“लाडकी बहीण योजना नाही, ‘ती’ ७६ लाख मते महायुतीच्या विजयाची शिल्पकार”; संजय राऊतांचा दावा
9
"अपमान सहन केला जाणार नाही"; किरीट सोमय्यांची भाई जगतापांविरोधात पोलीस आयुक्तांकडे तक्रार
10
फ्युचर अँड ऑप्शन्स ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, NSE नं केला मोठा बदल
11
IND vs PAK मॅचमधील भारतीय कॅप्टन अन् युधजीत यांनी घेतलेला मस्त रिले कॅच एकदा बघाच (VIDEO)
12
२०० रुपयांसाठी देशासोबत विश्वासघात! पाकिस्तानी गुप्तहेराला माहिती पुरवणाऱ्या मजुराला गुजरातमधून अटक
13
ICC Champions Trophy 2025 : जर हट्ट सोडला नाही तर PCB ला बसेल मोठा फटका; BCCI च्या मनासारखं होणार?
14
₹१८० वर जाणार TATA चा 'हा' शेअर, आताही २२% स्वस्त; LIC कडे आहेत ९५ कोटी शेअर्स 
15
Video - कष्टाचं फळ! मजूर झाला डॉक्टर; दिवसा रोजंदारीवर काम अन् रात्री खूप अभ्यास
16
शुक्र-चंद्र योग: १० राशींना झटपट लाभ, विशेष कृपा; सुख-समृद्धी वृद्धी, पद-पैसा-प्रतिष्ठा लाभ!
17
विधानसभेच्या मतदानाआधीच काँग्रेसला लागली होती पराभवाची कुणकूण? तो अंतर्गत सर्व्हे चर्चेत
18
तरुणाला वारंवार भेटायची विवाहित महिला, मुलाच्या आईने खडसावताच संतापली आणि...
19
वर्षभरात दिलाय ३३ टक्क्यांपर्यंत रिटर्न, कोणत्या Mutual Fund नं दिले बेस्ट रिटर्न्स, कोणती आहेत सेक्टर्स?
20
स्वप्नील जोशीने दिली 'मुंबई पुणे मुंबई ४' ची हिंट? मुक्ता बर्वेला टॅग करत म्हणाला...

आपत्ती व्यवस्थापनाचे दरवर्षी वाजतात बारा

By admin | Published: June 14, 2015 12:20 AM

पावसाळ्यापूर्वी दरवर्षी प्रशासन नियोजन करते. मात्र, प्रत्येकवेळी या नियोजनाचे तीनतेरा वाजलेले दिसतात़

साडेतीन हजार घरे प्रभावीत : दहा वर्षांत २७ जणांचा मृत्यू धामणगाव रेल्वे : पावसाळ्यापूर्वी दरवर्षी प्रशासन नियोजन करते. मात्र, प्रत्येकवेळी या नियोजनाचे तीनतेरा वाजलेले दिसतात़ काही वेळा तर अपुऱ्या सामग्रीमुळे या नियोजनाचा पूरता फज्जा उडतो. यावर्षीसुध्दा आपत्ती व्यवस्थापनाचे बारा वाजले असल्याचे स्पष्ट चित्र पुढे आले आहे. मागील दहा वर्षांत झालेल्या पावसाळ्यात साडेतीन हजार घरे प्रभावीत झालीत. २७ जणांचा बळी व १४० जनावरे दगावली़ धामणगाव तालुक्याची भौगोलिक स्थितीत चंद्रभागा, विदर्भ, मोतीकोळसा, खोलाड, लोंडी, घोराड, या नद्यांचा समावेश आहे़ तब्बल २५ गावे दरवर्षी लहान मोठ्या आलेल्या पावसाने प्रभावीत होतात़ वर्धा- देवगाव हा सुपर एक्सप्रेस हायवे प्रत्येक पावसाळ्यात बंद होतो़ तालुक्यात दरवर्षी पुराची समस्या उदभवते़ निंभोरा राज, कळाशी, सोनेगाव खर्डा, आजनगाव, भिल्ली, नारगावंडी, दत्तापूर या गावाला पुराचा फटका बसतो़ थोडा जरी पाऊस झाला तरी अनेक गावांत पुराचे पाणी शिरते. दरवर्षी नालासफाईचे काम युध्दस्तरावर पावसाळा सुरू होण्यापूर्वी होत असले तरी कागदोपत्री झालेल्या या कामाचा फटका अनेक गावांना बसतो़ पुराचा सामना करण्यासाठी दरवर्षी आपत्ती व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात येते़ मात्र आयत्यावेळी याचा काही उपयोग होत नाही़ पावसाळ्यात आरोग्यसेवा पूर्णपणे कोलमडून जाते़ दरवर्षी केलेले नियोजन प्रत्येकवेळी कागदावरच राहत असल्याने नियोजनाचा फज्जा उडाला़ यंदाही पावसाळ्याला सुरुवात झाली असून दमदार पाऊस झाल्यास पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.महावितरणचा लपंडावदरवर्षी पावसाळा सुरू झाल्यानंतर अनेक गावांना महावितरणाचा फटका बसतो. थोडा पाऊस झाला तरी मंगरूळ दस्तगीर, अंजनसिंगी, तळेगाव दशासर, जुना धामणगाव या मोठ्या गावांसह परिसरातील वीज चार ते चाप तास पूर्णपणे बंद राहते़ मागील अनेक वर्षीपासून तुटलेले ताऱ गंजलेले खांब, व वाढणारा विद्युत दाब यामुळे हे प्रकार घडत आहे. वीज कंपनीने या पावसाळ्यात तरी ग्रामीण भागातील जनतेच्या जीवाशी खेळणे बंद करावे, असे नागरिकांनी म्हटले आहे.प्रत्यक्ष कामाची गरजआपत्ती व्यवस्थापनमध्ये तलाठी, मंडल अधिकारी, ग्रामसेवक, आरोग्य सेविका, पोलीस पाटील, यांचा महत्त्वाचा सहभाग असतो. परंतु प्रशासकीय कर्मचारी पावसाळ्यातही आपल्या मुख्यालयी उपस्थित नसल्याने अनेकांना मूलभूत सोयी त्यावेळी मिळत नाही़ मुख्यालयी उपस्थित राहण्यासाठी दरवर्षी प्रशासकीय यंत्रनेच्यावतीने संबंधित कर्मचाऱ्यांना पत्रव्यवहार केला जात असला तरी या पत्रांना अनेक कर्मचारी केराची टोपली दाखवीत असल्याची अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत़ग्रामीण भागात वाढते आजाराचे प्रमाणउन्हाळ्यात घराशेजारी असलेले शेणखते गावाबाहेर आपल्या शेतात टाकणे गरजेचे असताना ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षितपणामुळे शेणखताचे ढिगारे पावसाळ्यातही अनेकांच्या घरासमोर पहावयास मिळते़ पावसाचे पाणी या ढिगाऱ्यात शिरल्यानंतर दुर्गंधी व डासाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढते. पावसाळ्यात चिकनगुनीया या रोगाने तालुक्यात थैमान घालून चार लोकांचा बळी घेतला होता़ ग्रामीण भागात या बाबीमुळे आजाराचे प्रमाण दरवर्षी वाढत असल्याचे दिसत आहे़